Raj Thackeray News : जेव्हा राज ठाकरे छोट्या राजच्या हट्टासाठी खास मुंबईहून दापोडीत येतात...मनसैनिकाच्या मुलासाठी सरप्राईज

Raj Thackeray meets Raj Deshpande : मुलाच्या आजारावर सोळा-सतरा कोटी रुपये खर्च येणार आहे.
Raj Thackeray meets Raj Deshpande news
Raj Thackeray meets Raj Deshpande news Sarkarnama

Pimpri : आपल्या घणाघाती वक्तृत्वामुळे कठोर भासणारे मनसेचे अध्यक्ष आणि आक्रमक नेते राज ठाकरे तेवढेच संवेदनशील असल्याचा प्रत्यय बुधवारी (ता.२३) आला. आपला पदाधिकारी नाही, तर सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या दुर्धर व्य़ाधीग्र्स्त मुलाला भेटण्यासाठी ते खास मुंबईहून पिंपरी-चिंचवडमध्ये आले. ते त्याला भेटलेच नाही,तर पुण्यात उपचार नसलेल्या त्याच्या दुर्मिळ आजारावर उपचारासाठी त्याला ते मुंबईलाही आता नेणार आहेत.

राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्याच्या ज्या आजारी मुलाला भेटले त्याचेही नाव राज असेच आहे. त्याचे वडील विशाल देशपांडे हे मनसेच्या स्थापनेपासूनचे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते आहेत. ते रिक्षाचालक असून त्यांचा मुलगा राज याचेही राज ठाकरे हे सर्वाधिक आवडते नेते आहेत.

Raj Thackeray meets Raj Deshpande news
Onion Issue News : विरोधकांना नाक राहिले नाही..; अनिल बोंडेंचा शरद पवारांवर निशाणा ; व्यापाऱ्यांसाठी गळे काढण्याचे...

तो हा बारा वर्षाचा असून त्याला `मस्क्य़ूलर डिस्ट्रॉफी` हा हाडाचा दुर्मिळ,दुर्धर आजार आहे. त्यामुळे त्याचे सातवीतील शिक्षण आता थांबल्याची खंत त्याच्या वडिलांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केली. मुलाच्या आजारावर सोळा-सतरा कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यात हे उपचार पुण्यात उपलब्ध नसल्याने राज ठाकरे मुंबईतील डॉक्टरांकडे त्याला नेणार आहेत,असे देशपांडे यांनी सांगितले.

Raj Thackeray meets Raj Deshpande news
Rashmi Shukla Phone Tapping : 'फोन टॅपिंग' प्रकरणाला कायमचा पूर्णविराम ; रश्मी शुक्लांना मोठा दिलासा...

राजसाहेबांना भेटायचंच आहे...

"राजसाहेबांना भेटायचंच आहे," असा हट्ट राज देशपांडे याने आपल्या वडिलांकडे धरला होता. तो राज ठाकरेच्या कानावर पडताच त्यांनी तो फक्त तीन दिवसांत पूर्ण केला.त्यांनी राज देशपांडेसाठी स्वत: खरेदी करुन खेळणी आणि खाऊ आणला. त्याच्यासोबत १५ ते २० मिनिटे गप्पा मारल्या. राज देशपांडे हा राज ठाकरेंसारखाच पोशाख करतो. म्हणजे त्यांच्यासारखा पांढरा झब्बा घालतो. या आपल्या आवडत्या झब्यावर त्याने आपल्या आवडत्या नेत्याची म्हणजे राज ठाकरेंची सही घेतली. या भेटीने देशपांडे कुटुंब भारावून गेले.

आमचा विठ्ठल आम्हाला भेटल्याचा आनंद..

मुलाच्या आजाराला तोंड देण्याचं बळ वाढल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. राज हा देशपांडेंचा लहान मुलगा असून मोठा १९ वर्षाचा आहे. ‘राज ठाकरे आमचे विठ्ठल असल्याने मी माझ्या मुलाचे नावही राज ठेवले, असे विशाल देशपांडे यांनी सांगितले. आमचा विठ्ठल आम्हाला भेटल्याचा मनस्वी आनंद झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी या भेटीनंतर दिली.

यावेळी मनसे नेते अविनाश अभ्यकर , किशोर शिदे,राजेंद्र वागसकर,रणजित शिरोळे, पिंपरी पालिकेतील मनसेचे माजी गटनेते सचिन चिखले तसेच राजु सावळे, विशाल मानकरी , बाळा दानवले , रुपेश पटेकर , अश्विनी बांगर , सिमा बेलापुरकर आदी उपस्थित होते

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com