Ajit Pawar News :  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : "स्टँप पेपर आण, लिहून देतो.." ; निवडणुकांबाबत अजित पवार म्हणाले..

Ajit Pawar On Mahavikas Aghadi : अरे बाबा.. अजित पवार पत्रकार परिषेदेतच..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा (Loksabha Election) आणि विधानसभा निवडणुकींसाठी विविध राजकीय पक्षांची चाचपणी सुरू आहे. शिंदे गट आणि भाजपकडून सत्ता राखण्यासाठी सज्ज आहे. तर महाविकास आघाडीही (Mahavikas Aghadi) यासाठी जय्यत तयारी करत आहे. तिन्ही पक्ष एकत्र लढवण्याबाबत सूत्रं आखत आहेत.

मात्र आघाडीच्या काही नेत्यांनी वेगळी चूल मांडण्याबाबत अधून मधून भूमिका व्यक्त करत असतात. यामुळे मविआत धुसफूस सुरू असते. यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ कायम राहिल का याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पुढील निवडणुकीत मविआ एकत्र राहिल का?

पुढील महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडुकांना महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित सामोरे जाणार का? याबाबत अजूनही स्पष्टता नसताना अजित पवारांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. मविआ एकत्रित निवडणुकींना सामोरे जाईल. पत्रकार परिषेदेत अजित पवारांना विचारण्यात आले की, मविआ आगामी निवडणुकांसाठी एकत्रित सामोरे जाणार का? य़ावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “स्टॅम्प पेपर आणा, मी लिहून देतो. महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार”.

"अशा प्रकारे काही चर्चा चालत असतात, एका पक्षातही विविध विचार सुरू असतात. अंतिम निर्णय मात्र त्या त्या पक्षाचे सर्वोच्च नेतेचे घेतील. आणि त्यांच्या निर्णयांची अंमलबजावणी पक्षाचे कार्यकर्ते करत असतात, असेही अजित पवार म्हणाले.

“आम्हालाही आमचं मत प्रदर्शित करण्याचा, तो मांडण्याचा अधिकार असतो. मविआची एकजूट अभेद्य राहावी, म्हणून वरिष्ठ पातळीचे निर्णय, तिन्ही पक्षांना मान्य असतात. यामुळे यातून वेगळा काही अर्थ काढायचा प्रयत्न करू नका," असेही अजित पवार म्हणाले.

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वेगवेगळी विधान समोर येत होती. मविआमध्ये मोठा भाऊ कोण? काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस अशी चर्चा सुरू झाली होती. याबाबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार इत्यादी नेत्यांनी भाष्य केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT