Budget Session : Satyajeet Tambe
Budget Session : Satyajeet Tambe Sarkarnama
मुंबई

Budget Session News: 'शाळेतला पहिला दिवस असल्याची भावना' : काय म्हणाले सत्यजीत तांबे?

सरकारनामा ब्यूरो

Budget Session : अपक्ष आमदार म्हणून विधान परिषेदेवर निवडून गेल्यानंतर सत्यजीत तांबे यांच्यासाठी आजपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पयीय अधिवेशन हे पहिले वहिले अधिवेशन आहे. आमदार म्हणून त्यांनी विधिमंडळात पहिल्यांदाच पाऊल ठेवणार आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका जाहीर केली आहे.

सत्यजीत तांबे म्हणाले, "यावेळी माझ्या भावना संमिश्र आहेत, शाळेतला पहिला दिवस जसा असतो, त्या पद्धतीचीच आज भावना आहे. आमदार या भूमिकेतून मी पहिल्यांदाच येत आहे. मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्यावर कोणता दबाव नाही, मनात कसली घालमेल नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे."

तांबे पुढे म्हणाले, "युवकांचा आवाज बनून विधानसभेत काम करायचं आहे. महाराष्ट्राच्या विकासात माझं काय योगदान देता येईल, याचा प्रयत्न मला करायचा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न मांडायचं काम मला करायचं आहे. माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा जो जुन्या पेंशन योजनेचा प्र्श्न प्रकर्षाने मांडणार आहे. सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न प्रामुख्याने मांडणार आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT