Kasba Peth Bypoll Election: भाजपच्या रासनेंनंतर आता आघाडीचे उमेदवार धंगेकर यांच्यावरही गुन्हा दाखल

BJP News : भाजपचे पदाधिकारी हे मतदारांना पैसे वाटत होते, असा आरोप करीत धंगेवर यांनी केला होता.
Ravindra Dhangekar - Hemant Rasne
Ravindra Dhangekar - Hemant RasneSarkarnama
Published on
Updated on

Pune News: कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल (रविवारी) मतदान झाले. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत मतदानानंतरही वाद संपण्याचे नाव घेत नाही.

भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मतदानाच्या आदल्या दिवशी (शनिवारी) कसबा पेठेत भाजपचे पदाधिकारी हे मतदारांना पैसे वाटत होते, असा आरोप करीत धंगेवर यांनी केला होता. त्यानंतर ते उपोषणास बसले होते. आचारसंहिता असताना त्यांनी कसबा गणपती समोर उपोषण केल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Ravindra Dhangekar - Hemant Rasne
Hemant Rasane News: मोठी बातमी ; राष्ट्रवादीच्या तक्रारीनंतर भाजपचे उमेदवार रासने यांच्यावर गु्न्हा दाखल

भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केले होते, याप्रकरणी रासने यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केलेल्या रासने यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केली होती.

Ravindra Dhangekar - Hemant Rasne
Maharashtra Budget : व्हीपवरुन अधिवेशन गाजणार ; ठाकरे गटाने शिवसेनेला दिला 'हा' इशारा

कसबा (Kasba) विधानसभा मतदार संघ 2009 मध्ये अस्तित्वात आला. या मतदार संघात दोन लाख 75 हजार 428 मतदार आहेत. कसब्यात 2009 मध्ये 49.7 टक्के, 2014 मध्ये 61.57 टक्के, तर 2019 मध्ये 51.62 टक्के मतदान झाले होते.

कसबा पेठ पोटनिवडणूक अनेक कारणामुळे चर्चेत आहे. मतदार यादीत नाव नसल्याने काही ठिकाणी मतदारांना मतदान करता आले नाही. तर काही मतदार याद्यांमध्ये मयतांची नावे आहेत. त्यामुळे अनेकांना मतदानाचा अधिकार बजावण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. निकाल २ मार्चला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com