vidhan bhavan maharashtra Sarkarnama
मुंबई

MLA Letter Mumbai BEST : 32 लाख प्रवाशांना सेवा देणाऱ्या 'बेस्ट'वर चर्चेसाठी 25 आमदारांना पत्र; पण विधिमंडळात चर्चा नाय

Maharashtra Budget Session Kamgar Sena 25 MLAs Mumbai BEST : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई बेस्ट उपक्रमावर चर्चेसाठी विधिमंडळातील 25 आमदारांना कामगार सेना अध्यक्ष सुहाम सामंत यांनी पत्र लिहिले.

Pradeep Pendhare

Mumbai BEST Discussion : राज्याच्या विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबई बेस्ट उपक्रमावर चर्चेसाठी 25 आमदारांना कामगार सेनेने पत्र लिहिले. परंतु एकाही आमदारांने बेस्ट उपक्रमावर चर्चा न केल्याने कामगार सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहे.

9 डिसेंबर 2024 मध्ये कुर्ला बस अपघात झाला होता. त्यावर बेस्टने नगर विकास विभागाला अहवाल देऊन देखील कारवाई झाली नाही. राज्यकर्त्यांना बेस्ट संपवायची आहे का, असा सवाल बेस्टच्या कामगार सेनेने केला आहे.

बेस्टची आर्थिक स्थिती, वाहक-चालकांचे अपुरे प्रशिक्षण, सुरक्षाव्यवस्था, अपुरा बस ताफा यावर आमदारांनी अर्थसंकल्पीय विधिमंडळात (Budget) चर्चा करावी, याकडे कामगार सेनेने आमदारांनी लक्ष वेधले होते. यासाठी 25 आमदारांना पत्र लिहिल्याची माहिती कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिली.

मुंबईत (Mumbai) दररोज जवळपास 32 लाख प्रवासी बेस्टने प्रवास करतात. मात्र, काही वर्षांपासून भाडेतत्त्वावरील बसचा पुरवठा, त्यातून घडणारे अपघात, आर्थिक तूट, याचा परिणाम बेस्टच्या प्रवासी संख्येवर होत आहे. कुर्ला बेस्ट अपघातात 14 लोकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर बेस्ट उपक्रमात धोरण तयार होणे अपेक्षित होते. नगर विकास विभागाकडे यासंदर्भात अहवाल दिला होता. परंतु तो अद्याप प्रलंबित असून, त्यावर कार्यवाही झालेली नाही, असे बेस्ट कामगार संघटनेचे म्हणणे आहे.

मुंबईतील बेस्ट उपक्रमला खासगीकरणाचा फटका बसत आहे. त्याचबरोबर भाडेतत्त्वावरील बस, कंत्राटी कर्मचारी, त्यांचे प्रशिक्षण, बसची कमी झालेली संख्या, यामुळे बसफेऱ्यांवर परिणाम होत आहे. त्यामुळे बेस्टचे उत्पन्नही घटल्याकडे कामगार संघटनांनी लक्ष वेधले आहे. 25 आमदारांना पत्र पाठवले असून, त्यात बेस्टच्या सद्यःस्थितीमुळे बससेवेवर कसा परिणाम होत आहे, यावर प्रकाश टाकला आहे. अद्याप तरी बेस्टचा प्रश्न अधिवेशनात विचारलेला नाही, असा आरोप सुहास सामंत यांनी म्हटले.

एसटीच्या बसगाड्या, त्यासाठी निधी, यावर अधिवेशनात चर्चा झाली. मग 'बेस्ट'च्या स्वतःच्या बसगाड्या, त्यासाठी आर्थिक तरतूद यावर चर्चा का नाही? सरकार 'बेस्ट' बस बंद पाडण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT