Krishna Andhale Wanted : वाँटेड कृष्णा आंधळेकडील पुराव्यांबाबत धनंजय देशमुखांचा मोठा दावा; 98 दिवसांपासून पोलिस मागावर

Beed Dhananjay Deshmukh Krishna Andhale evidence Santosh Deshmukh murder case : बीड संतोष देशमुख यांच्या हत्येत वाँटेड कृष्णा आंधळे याच्याकडे महत्त्वाचे पुरावे असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे.
Krishna Andhale
Krishna AndhaleSarkarnama
Published on
Updated on

Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या हत्येत 98 दिवसांपासून कृष्णा आंधळे वाँटेड आहे. हत्येसंदर्भात त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे आहेत.

खटल्याच्या दृष्टीने कृष्णा आंधळे सापडणे अतिशय महत्त्वाचे आहे. तपास यंत्रणेकडून यासंदर्भात कार्यवाही होणे गरजेचे आहे, अशी मागणी धनंजय देशमुख म्हटले.

संतोष देशमुख यांच्या हत्येत 'एसआयटी'ने दोषारोपपत्र दाखल केले असून, त्यात धक्कादायक अशी माहिती समोर आली. यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना यानंतर राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख हत्येत एकूण आठ आरोपी असून, त्यातील आठवा क्रमांक असलेला कृष्णा आंधळे हा अजूनही पसार आहे.

Krishna Andhale
Top 10 News : वेलकम बॅक सुनीता, राज्यसेवेची जाहिरात आली, बच्चू कडूंना दिलासा - वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

कृष्णा आंधळे हा हत्येच्या गुन्ह्यापासून पसार आहे. त्याला पसार झाल्यापासून 98 दिवस झाले आहेत. त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे असू शकतात. त्यामुळेच तो पोलिसांना (Police) शरण येत नाही. तो तपास यंत्रणेला गुंगारा देत असल्याची शक्यता धनंजय देशमुखांनी वर्तवली आहे. मध्यंतरी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचे समोर आले होते. तसे सीसीटीव्ही चित्रीकरण देखील व्हायरल झाले होते.

Krishna Andhale
Prakash Ambedkar: औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या; आंबेडकरांच्या विधानानं खळबळ

नाशिकमध्ये असल्याचा अफवाच

नाशिक पोलिसांनी कृष्णा आंधळेच्या शोधात, सर्च आॅपरेशन राबवले. पण कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची अफवाच निघाली. कृष्णा आंधळे गेल्या 98 दिवसांपासून वाँटेड असून, पोलिस भरतीची तयारी करता करता तो गुन्हेगारी वळला. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहून काही काळ त्याने पोलिस भरतीची तयारी केली होती. त्यामुळे तो 'शार्प माईंड'ने विचार करूनच, पसार झाल्याचा दावा केला जात आहे.

कृष्णा का सापडत नाही

कृष्णा आंधळे कुठे एका ठिकाणी राहत नसवा, स्थळ बदलून, रुप बदलून राहत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पसार झाल्यापासून त्याने बीडमधील त्याचे संपर्क नेटवर्क कायमचे तोडले आहे, त्यामुळे त्याच्या शोधात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.

कृष्णाची गुन्हेगारी पार्श्वभूमी

वाँटेड असलेला कृष्णा आंधळेविरुद्ध 2023 मध्येही त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आहे. तरी त्याला अटक झालेली नाही. मागील चार वर्षांत त्याच्यावर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने धारूर, आंबाजोगई, आणि केज पोलिस ठाण्यांमध्ये खंडणी, मारामारी, आणि खुनाचे प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com