Eknath Shinde News : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2023 ) आजपासून ( २७ फेब्रुवारी ) सुरुवात होत आहे. तब्बल महिनाभर अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. अधिवेशनाच्या एक दिवस आधी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. चहापानाला उपस्थिती लावली असती तर, आमच्याकडून महाराष्ट्र द्रोह घडून आला असता, अशी टोकदार टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारवर केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहिण असलेल्या हसीना पारकर यांना ज्यांनी चेक दिला, त्यांच्याच मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला. तरीही, अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा घेतला नव्हता. एक बरे झाले की, अशा राष्ट्रद्रोही लोकांसोबत चहा पिण्याची आमची वेळ टळली,” असा घणाघात शिंदेंनी केला.
मात्र आता एकनाथ शिंदेच्या या टिकेवर राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडून पलटवार केला गेला आहे. आव्हाडांनी शिंदेंना एक प्रश्न विचारला आहे. “सुभाषसिंग ठाकूर कोणाचा माणूस आहे, याचं उत्तर द्यावं,” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
“राज्याची एकंदरीत दयनीय अवस्था झालेली आहे. राज्य कर्जबाजारीच्या परिस्थितीत आहे. लोकांवर डोक्यावर हजारो रुपयांचं कर्ज आहे. केवळ घोषणाबाजी केली जात आहे," असे आव्हाड म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.