Womens Reservation News : Sarkarnama
मुंबई

Womens Reservation News : 'आरक्षण मिळेल, पण असंख्य ‘निर्भयां’चा न्याय कोण करणार?'; ठाकरेंचा मोदी सरकारला थेट सवाल

अनुराधा धावडे

Mumbai Political News : महिला आरक्षण विधेयक आणखी शंभर महिलांना खासदारकीचा मुकुट चढविण्यासाठी आहे. पण महागाई, कौटुंबिक हिंसा, शोषण, बलात्कार, खून, त्यातून बळी पडलेल्या असंख्य ‘निर्भयां’चा न्याय कोण करणार? असा प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे. तसेच, महिलांना आरक्षणाइतकाच न्याय आणि सुरक्षा हवी आहे. घरातील चुली पेटत्या ठेवण्यासाठी किमान स्वस्ताई हवी आहे, असही ठाकरे गटाने नमूद केलं आहे.

लोकसभेत महिलांना आरक्षण देणारे नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक मंजूर करण्यात आले. लोकसभेत हे विधेयक मांडल्यानंतर दोन दिवस यावर चर्चा झाली आणि लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आले. आज हे विधेयक राज्यसभेत मांडले जाईल. मात्र, हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राजकारणात असलेल्याच महिलांना याचा फायदा होईल; पण सर्वसामान्य महिलांना याचा काय फायदा, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने देशातील महिलांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

"लोकसभा आणि विधानसभेत आता महिलांना 33 टक्के आरक्षण मिळेल. म्हणजे लोकसभा आणि विधानसभेत महिलांचा आवाज वाढेल, पण मोजक्या महिलांना खासदार-आमदार केल्याने महिलांचे सबलीकरण खरंच होईल का? महिलांचे हक्क, त्यांची सुरक्षा, त्यांची प्रतिष्ठा यास चार चांद लागतील का? " असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

"नव्या संसद भवनाची सुरुवात महिला विधेयकाने झाली हे खरे, पण याच नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यातून ‘महिला’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वगळले होते. मुर्मू या आदिवासी महिला आहेत हे पहिले कारण. त्या महिला असल्याने काहींचा अहंकार दुखावला गेला. त्यामुळे संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना बाद करणाऱ्या सरकारने महिलांचे हक्क, सन्मान यावर प्रवचने करावीत, हे आश्चर्यच," असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

"भारतीय जनता पक्षाने स्मृती इराणींसारख्या काही महिलांना संसदेत आणले, पण त्यांचे राष्ट्रीय कार्यात योगदान काय? गांधी कुटुंबाबाबत चिडचिड करणे, असभ्य भाषेचा वापर करणे यासाठी संसदेत येण्याचे कारण नाही, " अशीही टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT