Udhayanidhi Stalin News : यालाच म्हणतात, 'सनातन धर्म'; उदयनिधी पुन्हा बरळले, संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना...

Parliament Special Session : ...कारण त्या आदिवासी आणि विधवा असल्यामुळे त्यांना निमंत्रण दिले नाही.
Parliament Special Session
Parliament Special Session Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : सनातन धर्माची तुलना डेंगी आणि मलेरियाशी करणारे तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांना मोदी सरकारने निमंत्रण दिले नाही, यावरून उदयनिधी यांनी याचा संबंध सनातन धर्माशी जोडला आहे.

डीएमकेच्या एका बैठकीत त्यांनी हे विधान केले आहे. "सगळ्यांनी नवीन संसद भवनाचा दौरा केल. मात्र, राष्ट्रपतींना त्यांचे निमंत्रण दिले नाही. कारण त्या आदिवासी आणि विधवा असल्यामुळे त्यांना निमंत्रण दिले नाही, यालाच सनातन धर्म म्हणतात," असे उदयनिधी स्टॅलिन म्हणाले.

सनातन धर्मावर टीका केल्यानंतर भाजप नेत्यांसह अनेकांनी उदयनिधी यांच्यावर चौफेर टीका होत असताना त्यांनी हे विधान केले आहे. "नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या पूर्व संध्येला तामिळनाडूच्या धार्मिक प्रमुखांना निमंत्रण देण्यात आले होते; पण ज्या देशाच्या प्रथम नागरिक आहेत, त्या राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले नाही," असे उदयनिधी म्हणाले. संसदेच्या नव्या इमारतीमध्ये मंगळवारपासून (१९ सप्टेंबर) कामकाजाला सुरुवात झाली आहे.

Parliament Special Session
Maratha Reservation Meeting: मराठा आरक्षणाच्या बैठकीला काँग्रेस, ठाकरे गटाच्या खासदारांची दांडी

यापूर्वी उदयनिधी स्टॅलिन काय म्हणाले?

“सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजेत. आपण डेंगी, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे,” असं विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं आहे.

Parliament Special Session
Women Reservation Bill : मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com