Former BAVIA chairpersons Rajesh Dhage, Maya Chaudhary and Kalpak Patil officially join the BJP in the presence of party leaders. sarkarnama
मुंबई

Ravindra Chavan Politics : एकनाथ शिंदेंना दणका दिल्यानंतर रवींद्र चव्हाण वसईच्या ठाकूरांना भिडले; 'बविआ'चे तीन माजी सभापती फोडले

Rajesh Dhage Maya Chaudhary Join BJP : बहुजन विकास आघाडीला भाजपने गळती लावली आहे. तीन माजी सभापतींनी बविआची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

संदीप पंडित

Vasai News : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या आधी कल्याण-डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुरुंग लावला. मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदेंची साथ सोडून भाजपमध्ये येत आहेत. आता शिंदेंनंतर चव्हाणांची नजर हितेंद्र ठाकूर यांच्या बविआकडे गेली आहे.

विधानसभा आणि लोकसभेतील पराभवानंतर बहुजन विकास आघाडीतील (बविआ) कार्यकर्ते, पदाधिकारी अस्वस्थ आहेत. त्याचाच फायदा घेत रवींद्र चव्हाणांनी बविआला धक्क देत तीन माजी सभापतींना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे.

बविआचे माजी बांधकाम समिती सभापती राजेश ढगे, माजी महिला बालकल्याण समिती सभापती ॲड. माया चौधरी, माजी परिवहन समिती सभापती कल्पक पाटील, माजी नगरसेविका सुषमा दिवेकर,ज्योती राऊतसह यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यासाठी आमदार राजन नाईक, जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी पुढाकार घेतला.

35 वर्षाच्या सत्तेला आव्हान

वसईमध्ये गेली ३५ वर्षांपासून बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे.महापालिकेत देखील बविआ प्रचंड बहुमताने निवडणूक येत होती. मागील पंचवार्षिक निवडणुकीत विरोधकांचे अस्तित्वसुद्धा वसईत दिसून येत नव्हते. मात्र, विधानसभा आणि लोकसभेतील बविआच्या पराभवानंतर बविआमध्ये अस्वस्थता आहे. भाजपने बविआमध्ये फूट पाडत त्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्या यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आगामी महापालिकेत बविआ विरुद्ध भाजप अशी लढत होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT