Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : मंत्रिमंडळ विस्ताराची पुन्हा चर्चा; उपमुख्यमंत्री फडणवीस अमित शाहांच्या भेटीला

Fadnavis Went To Delhi : जाहिरातीमुळे भाजप-शिवसेनेत कुठलेही वितुष्ट नाही

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Cabinet Expansion : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (ता. १७) सायंकाळी दिल्लीला रवाना झाले आहेत. ते भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस शाह यांच्याशी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. काही आमदार गुडघ्याला बाशिंगही बांधून बसले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीही अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळीही मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचे बोलले जात होते.

या चर्चांमुळे महिनाभरात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सत्ताधारी आमदार म्हणाले होते. त्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे सांगितले होते. मात्र अद्यापही तो झाला नसल्याने विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत.

दरम्यान, राज्यात एक जाहिरात झळकली. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पसंती असल्याचा दावा करण्यात आला होता. ही जाहिरात आम्ही दिली नसल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. मात्र या जाहिरातीमुळे भाजपच्या गोटात नाराजीचे वातावरण पसरल्याची जाहिर कबुली वरिष्ठ नेत्यांनी दिली होती. यानंतर जाहिरातीमुळे भाजप-शिवसेनेत कुठलेही वितुष्ट निर्माण झाले नसल्याचे शिंदे-फडणवीस यांनी सांगितले. यानंतर हा प्रकरणावर पडदा पडला.

आता फडणवीस दिल्लीला गेले आहेत. तेथे ते अमित शाह यांच्याशी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिंदे गटातील विद्यमान पाच मंत्र्यांच्या अहवालाबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीनंतर राज्यात आता कधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, चर्चेतील त्या पाच मंत्र्याबाबत काय निर्णय घेतला जाणार, तसेच आगामी मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार आदी प्रश्नांकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT