Palghar Politics : शिंदे-फडणवीसांकडून ठाकुरांचे तोंड भरून कौतुक; पालघरच्या राजकारणात नवा अध्याय !

Eknath Shinde And Hitendra Thakur : आमदार हिंतेंद्र ठाकूर सर्वच पक्षांना हवेहवेसे
Devendra Fadnavis, Hitendra Thakur, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Hitendra Thakur, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Palghar political News : मूळ शिवसेनेत असताना आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यातून विस्तव जात नव्हता. आता या कट्टर विरोधकांनी जुळवून घेतले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यातील ताणलेले संबंध शिथिल झाले. दरम्यान पालघर येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रामात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठाकूर यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. (Latest Marathi News)

वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे नेतृत्व वसई-विरार पलीकडे जिल्ह्यातही मानले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाची दखल आता सारेच पक्ष घेऊ लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे ठाकूर यांचे कौतुक केले. त्यांनी हितेंद्र ठाकूर हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या कार्याचेही कौतुक केले. यामुळे ठाकूर यांचे पालघर जिल्ह्यात वजन वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Devendra Fadnavis, Hitendra Thakur, Eknath Shinde
BJP on Congress: युवक काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा : काँग्रेसने आपली संस्कृती दाखवलीच; भाजपची टीका

हितेंद्र ठाकूर यांचे सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध असल्याचे वारंवार समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, अजित पवार यांच्याशीही आमदार ठाकूर यांचे सलोख्याचे संबंध आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातही ठाकूर यांच्या जवळ असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यातील संबंध पूर्वी ताणले गेले होते. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी ठाकूर यांच्याशी जुळवून घेण्याचे संकेत दिले होते. भर सभागृहात शिंदे यांनी "अप्पा आता शिकायत का मौका नहीं दुँगा" असे ठाकूर यांना उद्देशून म्हटले होते.

Devendra Fadnavis, Hitendra Thakur, Eknath Shinde
Prakash Ambedkar On Aurangjeb : औरंगजेबाच्या दरबारात कोण होते ? हा इतिहास आधी तपासा..

दोन दिवसापूर्वी पालघरला झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकूर यांचे कौतुक केले. आपल्या भाषणात त्यांनी वारंवार हितेंद्र ठाकूर यांचा उल्लेख केला. यामुळे सर्वच पक्षांना पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांची साथ हवी असल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, नारायण राणे, प्रवीण दरेकर गिरीश महाजन, या भाजपच्या नेत्यांनी तर भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतलेली आहे. त्यावेळी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

Devendra Fadnavis, Hitendra Thakur, Eknath Shinde
Ravikant Tupkar News : प्रत्येकवेळी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला, पण तुमच्या एकजुटीने १० हत्तींचं बळ मिळालं !

बहुजन विकास आघाडीचे (BVA) पालघर जिल्ह्यात सहापैकी तीन आमदार आहेत. या राजकीय गणितांमुळे हिंतेंद्र ठाकूर यांच्याशी सर्व पक्षातील नेत्यांचे चांगले संबंध आहेत. ठाकूर आपल्याबरोबर आल्यास पालघरमध्ये आपल्या पक्षाचे वर्चस्व वाढेल, अशी या मागची सर्वच पक्षाची रणनीती आहे. सद्या भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, काँग्रेस यांना पालघरवर वर्चस्वासाठी हितेंद्र ठाकूर यांची मदत लागणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष सध्या हितेंद्र ठाकूर यांच्या प्रेमात असल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com