Vanchit Bahujan Aghadi : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ( Koregaon- Bheema Violence) तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला पाठवलं आहे. (Call Fadnavis for inquiry in Koregaon Bhima case: Ambedkar's demand)
फडणवीस यांच्यासोबतच तत्कालीन मुख्य सचिव सुमित मलिक आणि पुण्याचे माजी पोलीस अधीक्षक सुवेज हक यांचीही साक्षीदाराच्या पिंजऱ्यात साक्ष तपासण्याचीही मागणी केली आहे. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने आज (5 जून) साक्ष नोंदवण्यासाठी आयोगानं प्रकाश आंबेडकर यांनाही बोलावलं होतं. पण 5 जूनला पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आपण येऊ शकत नसल्याचं उत्तर त्यांनी दिलं. (Bheema-Koregaon Riots News)
1 जानेवारी जानेवारी 2018 साली कोरेगाव भीमा येथे मोठा हिंसाचार झाला. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोरेगाव भीमा चौकशी आयोग गठीत करण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या साक्षी आतापर्यंत नोंदवण्यात आल्या.प्रकाश आंबेडकर यांनाही आयोगाने चौकशीसाठी बोलवलं होतं. पण पूर्वनियोजत कार्यक्रमांमुळे येणं सध्या शक्य प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपण येऊ शकत नसल्याचं उत्तर दिलं. पण याच वेळी त्यांनी माझी साक्ष नोंदवण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलीस अधीक्षक यांची साक्ष नोंदवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
त्यांच्या या मागणीला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरही दिलं आहे. "प्रकाश आंबेडकर हे निष्णात वकील आहेत. आयोगासमोर कुणाला बोलवावं आणि कुणाला बोलवू नये. याची आंबेडकर यांनी चांगली माहिती आहे. पण राजकारणाची दिशा भटकवण्यासाठी आणि लक्ष दुसरीकडे वेधण्साठी त्यांनी अशी मागणी केली असावी, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी (Devendra Fadanvis) दिली आहे. यापूर्वीही लोकांनी अर्ज केले होते. पण आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे. आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता,तो त्यांनी घेतला आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.