Aditi Tatkare  Sarkarnama
मुंबई

Aditi Tatkare: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून फोन! नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या अदिती तटकरे तातडीने मुंबईला रवाना

Aditi Tatkare: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना तातडीचे आणि महत्त्वाचा संदेश असणारे फोन गेल्यानं काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा आहे. सध्या दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनिकरणाचा मुद्दा चर्चेत आहे.

Amit Ujagare

Aditi Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत. कारण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून पक्षाच्या आमदारांना तातडीने फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं हातातली कामं टाकून, दौरे अर्धवट सोडून आमदार मंडळी तातडीनं मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहेत. त्यातच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या देखील आपला नंदुरबारचा दौरा अर्ध्यावर सोडून बैठकीसाठी रवाना झाल्या आहेत.

मुंबईला बैठकीला यायचे आदेश

सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून तातडीचा आणि महत्वाचा फोन गेल्यामुळं नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या अदिती तटकरे यांचा दौरा अर्धवट सोडून दुपारीच मुंबईकडे रवाना होणार आहेत. खरंतर रात्री खान्देश एक्सप्रेसने त्या परतणार होत्या, पण मुंबईतून आलेल्या फोननंतर त्यांनी दुपारी 4 वाजता जळगावमार्गे थेट मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पार्थ पवारांनीही बोलावली बैठक

दरम्यान, दुसरीकडे पार्थ पवार यांनीही पुण्यातील महत्त्वाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे पक्षाच्या विलीनीकरणाबाबत काही मोठा निर्णय होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT