Big Decision for Students:  Sarkarnama
मुंबई

Big Decision for Students: आता परीक्षा द्यावीच लागणार; आठवीपर्यंत सरसकट 'पास'चा निर्णय रद्द

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra New Education Policy: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार, इयत्ता पाचवी आणि आठवीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आता पुर्नपरीक्षा घेण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. म्हणजेच नापास विद्यार्थ्यांची दोन महिन्यांच्या आत होणार पुनर्परीक्षा घेतली जाईल जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांची पुर्नपरीक्षा घेतली जाईल, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.

मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क या कायदा २०११ नुसार (Right to Education Act) आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास केले जात नव्हते. पण राज्य सरकारने या कायद्यात बदल केला आहे. आता नवीन शिक्षण धोरणानुसार आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

राज्य सरकारने याबाबत नोटिफिकेशनही जारी केलं आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचा आदेश मागे घेतला आहे. यामुळे आता पाचवी आणि आठवी इयत्तांना वार्षिक परीक्षा बंधनकारक करण्यात करण्यात आली आहे.

इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी नापास झाल्यास त्या विद्यार्थ्याला पुनर्परीक्षेचा पर्याय दिला जाईल. पण जर पुनर्परीक्षेतही विद्यार्थी नापास झाला तर त्याला पुन्हा पाचवी आणि आठवी वर्गातच त्या विद्यार्थ्याला ठेवले जाईल.

तसेच, पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाईल. पण सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांने पाचवीची परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा,पुनर्परीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित केली जाईल.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT