ED Action In Sangli : सांगलीत पारेख बंधूंची ईडीकडून १२ तास कसून झाडाझडती; छापेमारीचं कारण आलं समोर...

ED Action on Parekh Brothers In Sangli : मुंबई घोटाळ्याशी काही कनेक्शन आहे का?
ED Action In Sangli :
ED Action In Sangli :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli News : राज्यात मागील चार दिवसांपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे. मुंबई तसेच पुणे, सांगली आणि इतरही ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू होती. मुंबईतील कथित कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीची ही छापेमारी सुरू आहे. मुंबई पालिकेतील माजी अधिकारी आणि शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी करण्यात आली होती. यामध्ये एका अधिकाऱ्याच्या घरी जवळपास १०० कोटींची संपत्ती सापडल्याने, एकच खळबळ उडाली होती. (Latest Marathi News)

एका माजी अधिकाऱ्याच्या घरात १०० कोटींची संपत्तीचा तपशील आढळून आल्याने, एवढी माया जमवली कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे मुंबई पुण्यात छापेमारी सुरू असताना काल सांगलीतही ई़डीने छापेमारी केली. सांगली शहरातील प्रसिद्ध उद्योगपती पारेख बंधूंच्या निवासस्थानावर ईडीने ही छापेमारी केली होती.

ED Action In Sangli :
Kirit Somaiya On Mushrif : मुश्रीफांचा शिंदे - फडणवीसांसोबत फोटो; सोमय्या म्हणाले,'' त्यांच्याविरोधातल्या सुरु असलेल्या चौकशा....

सांगलीतील पारेख बंधूं वरील ईडीच्या छापेमारीचा कथित मुंबई कोविड घोटाळ्याशी काही संबंध नसल्याचे पुढे आले आहे. सांगलीत दिनेश पारेख आणि सुरेश पारेख हे पारेख बंधू प्रसिद्ध व्यावसायिक-उद्योजक आहेत. कॉन्ट्रॅक्टर, ईलेक्ट्रीकल आणि मेडिकल क्षेत्रातलं सांगलीतलं पारेख प्रस्थ आहे.

आता पारेख यांच्यावर ईडीने छापेमारी करण्याचं कारणही समोर आले आहे. पारेख बंधू अनेकांना आर्थिक पुरवठा वा फायनान्स करत होते. यामुळेच त्यांच्यावर छापेमारी करण्यात आली, अशी माहिती मिळतच आहे. यामुळेच पारेख यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. पारेख बंधूंच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आढळून आल्याचेही सांगण्यात येत आहे.

ED Action In Sangli :
ED Raid in Sangli : ईडीची तिसऱ्या दिवशीही छापेमारी सुरूच; सांगलीतील बड्या व्यावसायिकांवर टाच !

तपशीलवार माहिती नाहीच -

ईडीच्या पारेख बंधूं यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली आहे. तब्बल १२ तासांपेक्षा अधिक काळ पारेख बंधूंची तपासणी झाली. रात्री खूप उशीरापर्यंत ही चौकशी सुरू होती. शिवाजीनगर येथील पारेखांच्या दोन्ही घरांवर धाडी टाकण्यात आले होते. घराबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मात्र इडीने छापेमारीत नेमकी काय माहिती मिळाली याची माहिती देण्यास नकार दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.