MPSC News: Sarkarnama
मुंबई

MPSC News: एमपीएससी'च्या कारभाराचा उमेदवारांना फटका; कौशल्य चाचणीची परीक्षा पुन्हा द्यावी लागणार...

MPSC Latest News | गेल्या वर्षी गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपीक आणि टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती.

सरकारनामा ब्यूरो

MPSC Students News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत कर सहाय्यक व लिपीक आणि टंकलेखक या पदासाठी ७ एप्रिल रोजी कौशल्य चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी काही प्रमाणात उमेदवारांना परीक्षा देण्यास तांत्रिक अडचण आली होती. मात्र आयोगाने सर्व उमेदवारांना सरसकट पुन्हा कौशल्य चाचणी परीक्षा ३१ मे रोजी आयोजित करून पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा घाट घातला आहे. यावर मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी संतप्त प्रतिक्रिया देताना आत्ता पुन्हा अडचण काही तांत्रिक अडचण आल्यास तिसऱ्यांदा पुन्हा परीक्षा घेणार का ? असा सवाल ही व्यक्त केला आहे. (MPSC News)

गेल्या वर्षी गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपीक आणि टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच परीक्षेचा कौशल्य विकास चाचणीचा शेवटचा टप्पा पार पडला होता. गट -क अंतर्गत सहाय्यक पदाच्या २८५ तर लिपिक व टंकलेखक पदांसाठी १०७७ जगासाठी आयोगाकडून परीक्षा घेण्यात आली होती. जवळपास गेली वर्ष या परीक्षेची प्रक्रिया चालू आहे. आधीच परीक्षेची प्रक्रिया लांबली जात असताना पुन्हा काही उमेदवारांच्या करता सर्वांनी परीक्षा देणे अन्यायकारक असल्याने आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा देणार नाही, अशी भूमिका या परीक्षेच्या उमेदवारांनी घेतली होती. मात्र एमपीएससीने उमेदवारांच्या मागणीला न जुमानता पुन्हा एकदा परीक्षा घेणार असल्याचे घोषित केले आहे.

पुन्हा परीक्षा न देण्याच्या उमेदवारांच्या भूमिकेला अनेक राजकीय नेत्यांनीही आयोगाला पत्र लिहून पाठिंबा दिला होता. मात्र आयोगाने ताठर भूमिका घेताना कोणाला जुमानले नाही. गेली अनेक वर्षे आम्ही अभ्यास करत आहोत, आयुष्य पणाला लावून आम्ही इथपर्यंत पोहचलो. ज्यांना कोणाला तांत्रिक अडचण आली असेल त्यांची व्यवस्थित पुन्हा परीक्षा घ्यावी, मात्र आम्हाला पुन्हा परीक्षा देण्याचा अट्टहास आयोगाने धरू नये, अशी विनंतीही आयोगाकडे उमेदवारांनी केली आहे.

यावर्षी कौशल्य विकास चाचणीमध्ये आयोगाने मोठ्या प्रमाणात बदल केले. त्यानुसार आम्ही ७ एप्रिल रोजी परीक्षा दिली. आत्ता पुन्हां आयोगाने दुसऱ्यांदा परीक्षा घेण्याचा घाट घातला आहे. मात्र यावेळी पुन्हां तांत्रिक अडचण आली किंवा जे उमेदवार आधीच्या परीक्षेमध्ये पास झालेले होते ते आत्ता नापास झाले तर आयोग पुन्हा परीक्षा घेणार का? असा सवाल राज बिक्कड नावाच्या उमेदवाराने उपस्थित केला आहे. (MPSC Latest News)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT