Kishori Pedanekar|  Sarkarnama
मुंबई

Mumbai News : ठाकरे गटाच्या नेत्या Kishori Pednekar यांच्यावर गुन्हा दाखल ; BEST कर्मचाऱ्यांच्या PF वर मारला डल्ला ?

Case Filed Against Kishori Pednekars : ऑक्टोबर 2021 मध्ये 127 कर्मचार्‍यांचा पीएफ त्यांच्या खात्यात भरला नाही.

सरकारनामा ब्यूरो

Case Filed Against Former Mayor Kishori Pednekars Company : ठाकरे गटाच्या नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात लोअर परळ येथील एनएम जोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याआधी वरळीमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत लाभार्थी नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका बळकावल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर झाला होता. त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या (Kish Corporate Services Pvt. Ltd) तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जवळजवळ 264 बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (PF) रोखल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला गेला. या प्रकरणी वांद्रे येथील रहिवासी 45 वर्षीय विद्या संदीप बाबर नावाच्या तक्रारदाराने प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केला होता.

किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या मालकीची आहे. अनेक कर्मचाऱ्यांचा पीएफ कापला गेला पण त्यांच्या पीएफ खात्यात कधीही तो जोडला गेला नाही, असा आरोप बाबर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

किश कॉर्पोरेट सर्व्हिसेसचे प्रशांत महेश गवस, शैला प्रशांत गवस आणि गिरीश रमेश रेवणकर अशा तीन कर्मचाऱ्यांवर पीएफ खात्यात न जमा केल्याचा आरोप आहे.कर्मचाऱ्यांच्या पगारातून एकूण 4,47,84 रक्कम कापली गेली मात्र ती पीएफ खात्यात जमा केला नाही.

ऑक्टोबर 2021 मध्ये 127 कर्मचार्‍यांचा पीएफ त्यांच्या खात्यात भरला नाही, तर नोव्हेंबर 2021 मध्ये 137 कर्मचार्‍यांना पैसे दिले गेले नाहीत. आता या विरुद्ध नोंदवलेल्या प्रकरणात, भारतीय दंड संहितेच्या 406 (गुन्हेगारीचा भंग), 34 यासह इतर कलमे जोडण्यात आली आहेत.

वरळीमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत लाभार्थी नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका बळकावल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर याआधी झाला होता.

या आरोपाखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाकडून किशोरी पेडणेकर यांना दिलासा मिळाला आहे. पेडणेकर यांच्या याचिकेवर 30 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणात याचिकादाराविरोधात तूर्त आरोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT