Bala Nandgaonkar, Sandeep Deshpande, Vasant More
Bala Nandgaonkar, Sandeep Deshpande, Vasant More sarkarnama
मुंबई

राज ठाकरेंवर गुन्हा; बाळा नांदगावकर, संदिप देशपांडे नॉट रिचेबल अन् वसंत मोरे तिरुपतीला रवाना

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचे बडे नेते नॉट रिचेबल झाले आहेत. बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar), संदिप देशपांडे (Sandeep Deshpande), नितीन सरदेसाई (Nitin Sardesai), संतोष धुरी या सगळ्या नेत्यांचे मोबाईल फोन स्विच ऑफ (बंद) येत आहेत. तर मनसेचे माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) हे तिरुपती बालाजीला रवाना झाले असल्याची माहिती आहे.

दरम्यान, पोलिसांनी मनसेच्या (MNS) एका पदाधिकाऱ्याला चांदीवलीतून अटक केली आहे. मनसेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना पोलिस नोटीसा पाठवत आहेत. त्यातच पोलिसांकडून अटकेची ही पहिली कारवाई करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी मशीदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर पहिल्यांदा मनसेचे चांदीवली विभागाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी हनुमान चालीसा लावली होती. त्यामुळे त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्या ऑफिसमधून अनेक भोंगे जप्त करण्यात आले. घाटकोपर-चिरागनर पोलिसांकडून बर्वे नगर स्मशानभूमीतून भानूशाली यांना अटक केली. त्याचप्रमाणे मनसेचे महत्वाचे नेतेही नॉट रीचेबल असून फोन घेत नाही, त्यामुळे मनसे राज ठाकरे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्यभरातील मनसेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पोलिसांकडू धरपकड सुरु होण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झालेल्या मनसे पदाधिकारी राजीव जावळीकर यांच्याशी मनसे नेते अमित ठाकरे यांची फोनवर चर्चा केल्याची माहिती आहे. पक्ष सर्व परिस्थितीत तुमच्या पाठीशी असल्याचा शब्द अमित ठाकरे यांनी जावळीकर यांना दिला. अमित ठाकरेकडे जबाबदारी असलेल्या विद्यार्थी नवनिर्माण सेनेचे राजीव जावळीकर हे जिल्हाध्यक्ष आहेत.

मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांची मुंबईतील गुन्हे शाखेतील पोलिस अधिकार्यांसोबत ऑनलाईन चर्चा केली. मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये या अनुशंगाने काय खबरदारी घ्यायला हवी याचे पांडे यांनी मार्गदर्शन केले. राज यांच्या अल्टीमेटननंतर मुंबई पोलिस दलात हालचालींना आला वेग आला आहे. मुंबई पोलिसांनी एका आठवड्यात 855 लोकांना 149 ची नोटीस पाठवली आहे. 465 लोकांना 144 कलमाअंतर्गत 15 दिवसांसाठी मुंबईबाहेर पाठवण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT