तर राज ठाकरेंवरही पोलिस कारवाई करतील...नाना पटोले

दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक gun on Shoulder ठेवून उद्रेक करण्याचा भाजपाचा BJP प्रयत्न असून राज्यात धार्मिक तेढ Religious rift निर्माण होऊ नये याची राज्य सरकारने state Government खबरदारी घ्यावी, असेही श्री. पटोल Nana Patole यांनी स्पष्ट केले.
Nana Patole
Nana Patolesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ सरकार खपवून घेणार नाही. राज ठाकरे यांनी जर कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलिस त्यांच्यावरही कारवाई करतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी स्पष्ट केले आहे.

नाना पटोले म्हणाले, कोणाच्याही धर्माबद्दल थेट टीका करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे राज्य असून या विचाराचे रक्षण करण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरबाबत जे निर्देश दिले आहेत, त्याचे पालन प्रशासन करेल. कायद्याच्या पुढे जाऊन कोणी भूमिका घेत असेल तर ती महाराष्ट्रात चालणार नाही.

Nana Patole
भोंग्यावरून महाराष्ट्रात चालवलेला तमाशा बंद करा!.. नाना पटोले

हा विषय राज ठाकरे या व्यक्तीपुरता मर्यादित नाही. कायदा तोडणारा कोणीही असो त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी काँग्रेसने या विषयांवर चर्चा केली आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, याबाबत सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Nana Patole
जयंत पाटील म्हणतात; निवडणुका एकत्र लढू, शक्य नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढतीची तयारी

भाजपा राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा दोन वर्षापासून प्रयत्न करत आहे. यातून महाराष्ट्राची बदनामी होत असून त्याचा परिणाम गुंतणूक व रोजगार निर्मितीवर होत आहे. परिणामी तरुणांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होत आहे हे सर्व थांबले पाहिजे. महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत.

Nana Patole
'पुरंदरे, टिळक यांच्या समर्थनामुळे राज ठाकरे यांची आयडॉलॉजी स्पष्ट होते!'

बाहेरच्या राज्यातून तलवारी व इतर शस्त्र आणण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने उघड झाला आहे. धार्मिक विवाद करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे परंतु प्रशासन सतर्क आहे असून शासन व प्रशासन दोघेही राज्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न हाणून पाडतील, असेही श्री. पटोले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com