Kirit somaiya, Sanjay Raut  sarkarnama
मुंबई

Sujeet Patkar : राऊतांच्या अटकेनंतर पाटकर रडारवर ; सोमय्यांचे नवं टि्वट

Sujeet Patkar : राऊतांना अटक झाल्यानंतर त्यांचे व्यावसायिक मित्र सुजीत पाटकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे सहकारी सुजीत पाटकर व त्यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट कंपनीने कोविड सेंटरच्या नावावर शंभर कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी टि्वट करीत ही माहिती दिली आहे.

"मी न्यायालयात गेल्या नंतर आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गैरव्यवहार 100 कोटींच्या वर असल्याने मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशाने याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. मला विश्वास आहे आता लवकरच कारवाई होईल,"असे सोमय्या म्हणाले.

संजय राऊत पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊतांना अटक झाल्यानंतर त्यांचे व्यावसायिक मित्र सुजीत पाटकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुजीत पाटकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. करोना केंद्राच्या कंत्राटात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचाआरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत या गैरव्यवहारप्रकरणी चौकशीला गती मिळेल, असा दावाही सोमय्या यांनी केला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

कोरोना केंद्राच्या कंत्राटातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे व्यावसायिक मित्र सुजीत पाटकरसह आणखी तिघांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर त्यांचे व्यावसायिक मित्र सुजित पाटकर रडारवर आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT