मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं (shivsena) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून वेगवेगळी नावं आणि चिन्ह देण्यात आली आहेत. शिवसेना कुणाची हा निर्णय लागेपर्यंत दोन्ही गटांना आगामी निवडणुकांमध्ये याच चिन्हं आणि नावासह रिंगणात उतरावं लागणार आहे. (Andheri By Election latest news)
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये (Andheri By Election) उद्धव ठाकरे नवीन चिन्ह आणि पक्षाच्या नावासह रिंगणात उतरत आहेत. शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.
उद्धव ठाकरे यांनी या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके उमेदवारी दिली आहे. तर भाजप आणि शिंदे यांनी अजून उमेदवाराची घोषणा केलेली नाही,पण भाजपच्या मुर्जी पटेल यांना या मतदारसंघातून तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. पटेल यांनी या निवडणुकीसाठी सहा महिन्यापासून तयारी केली आहे.
शिवसेवनेच्या शिंदे गट (Eknath Shinde) आणि ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह आणि नाव मिळाल्यावर दोघांकडून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. अशातच दोन्ही गटाकडून आता उमेदवार सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत
निवडणूक आयोगाचा हा निर्णय आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींचे आभार मानले, तसंच महाविकासआघाडी भक्कम करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांना गळाला लावण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना ‘बाळासाहेबांची शिवसेना ’ पक्षात आणून आपला पक्ष व भाजप युतीची उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत.
भाजपच्या मुर्जी पटेल (Murji Patel) यांनी मतदारसंघात आपला प्रचार सुरु केला असला तरी शेवटच्या क्षणी ऋतुजा लटके शिंदे गटात येण्याची शक्यता गृहीत धरून सर्व पर्याय खुले ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपकडून अद्याप मुर्जी पटेल यांनी उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.