Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : CM शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राची कृषी क्षेत्रात दमदार कामगिरी; केंद्र सरकारचा 'हा' पुरस्कार जाहीर

Maharashtra Agriculture Development : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 10 जुलैला पुरस्कार स्वीकारणार.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra News : भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील 15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला 2024 चा सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 10 जुलै रोजी नवी दिल्लीत हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार शेती संदर्भात सरकारने सुरू केलेल्या नवीन योजना, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी आणि ग्रामीण विकासासाठी सुरू केलेल्या योजनांसाठी दिला जात आहे.

पुरस्कार वितरणावेळी यावेळी केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी Nitin Gadkari यांच्यासह कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, ब्राजील, अल्जीरिया, नीदरलॅड देशाचे राजदूत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालॅड राज्यातील मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.

म्हणून महाराष्ट्राला पुरस्कार...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या नेतृत्वात 21 लाख हेक्टर वर बांबू लावण्याचे सर्वात मोठे मिशन हाती घेण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 17 लाख हेक्टरवर कृषी सिंचन पाणी पोहोचण्यासाठी 123 योजना राबवण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची रक्कम दुप्पट करणार महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्याचबरोबर नॅनो तंत्रज्ञानद्वारे खतांचे वितरण करण्यासाठी 4.63 लाख शेतकऱ्यांना सरकारने मदत केली आहे.

2023 ला सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार बिहारला तर 2022 तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशला देण्यात आला होता. 2008 ला या पुरस्काराची सुरुवात डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालील समितीत करण्यात आली होती. 2008 चा पुरस्कार आंध्रप्रदेशला देण्यात आला होता.

आत्तापर्यंत हा पुरस्कार

राजनाथ सिंह, दिवंगत नेते प्रकाश सिंह बादल, रतन टाटा, दिवंगत डॉ. एमएस स्वामीनाथन, दिवंगत प्रो. वी. कुरियन, बराक ओबामा यांचे कृषी सल्लागार इस्लाम सिद्दीकी, डॉ. बलराम जाखड़, शिवराज सिंह चौहान, प्रोफेसर पी.के धुमल यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT