Shambhuraje Desai News: ठाण्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाईंना शोधा; मुरबाडमधील 'त्या' बॅनरची एकच चर्चा

Shivsena Politics News : ठाणे जिल्ह्यात 'पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना शोधा आणि एक गावठी कोंबडा वळगणीचे मासे बक्षीस जिंका', असा आशय असलेला बॅनर चर्चेत आहे.
shammbhuraj desai
shammbhuraj desai Srakarnama
Published on
Updated on

शर्मिला वाळुंज

Dombivali News : लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करीत असल्याने वातावरण चांगेलच तापले आहे. त्यातच आता राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने एकमेकांवर टीका करीत कोंडीत पकडले जात आहे. त्यामुळे नेते मंडळीतील कलगीतुरा चांगला रंगला आहे.

साहेब, आपला पत्ता कुठेच लागत नाही, तुम्ही जिथे असाल तिथून परत या. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. जिथे कुठे असाल तुम्ही परत या आम्ही तुमची वाट पाहतोय, आपल्या जिल्ह्यात अनेक समस्या आहेत. असे म्हणत ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी पालकमंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraje desai) यांना जिल्ह्याचा दौरा करण्याची साद घातली आहे. एवढेच नाही तर 'पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना शोधा आणि एक गावठी कोंबडा वळगणीचे मासे बक्षीस जिंका', असा आशय असलेला बॅनर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. (Shambhuraje Desai News)

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचौडे यांनी हा बॅनर लावला असून त्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात होत आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर फारसे येताना दिसत नाहीत. डोंबिवलीत अमुदान कंपनीत स्फोट होऊन काही कामगार मृत्यू पावले. एवढी भीषण परिस्थिती जिल्ह्यात असताना देखील शिवसेना नेते आणि पालकमंत्री शंभुराज देसाई डोंंबिवली एमआयडीसीत नाहीच, पण ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नाहीत.

पालकमंत्री शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या खास विश्वासतले म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांना साताऱ्याचे असूनही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आल्याची चर्चा सुरवातीपासून आहे. मात्र, जिल्हा विकास नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती लावण्या व्यतिरिक्त ते फारसे कुठे दिसत नाहीत. जिल्हा विकास नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती लावली म्हणजे जिल्ह्यातील समस्या सुटल्या असे होत नाही. यासाठी जिल्ह्याचा दौरा करावा लागतो. पावसाळा सुरू झाला आहे.

shammbhuraj desai
Video Ajit Pawar : अजितदादा जयंतरावांना असं का म्हणाले, 'श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा'

ठाणे जिल्ह्याच्या गावोगावी अनेक समस्या आहेत. त्या समजून घेण्यासाठी पालकमंत्री फिरत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. मुरबाडमधील भर बाजारपेठेत पालकमंत्री देसाई यांना शोधा आणि गावठी कोंबडा बक्षीस मिळवा, असा फलक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लावण्यात आल्याने जिल्हाभर हा विषय चर्चेचा झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांची तुफान वाहन कोंडी होत आहे. या महामार्गावर वासिंद, खातिवली, आसनगाव रेल्वे स्थानकाजवळील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेली कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. आसनगाव-कसारा रेल्वे मार्गावरील नाशिक महामार्गावरील उड्डाणपूल गेल्या तीन वर्षांपासून रखडला आहे.

shammbhuraj desai
Gokul Dudh Sangh : गोकुळ दूध संघात 35 लाखांचा घोटाळा करणाऱ्याला अभय कोणाचे?

या पुलावरील एका मार्गिकेतून वाहने धावतात. त्यामुळे माल वाहतूकदार, प्रवासी हैराण आहेत. हे सर्व विषय का रखडले आहेत याची माहिती घेऊन त्यांना कामाला लावणे हे पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांचे काम आहे. पण पालकमंत्री देसाई ठाणे जिल्ह्यात फिरकत नसल्याने राजकीय पक्षासह नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी पालकमंत्री देसाई यांना ठाणे जिल्ह्याचा विभागवार दौरा करून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याची, त्या मार्गी लावण्यासाठी सूचना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

shammbhuraj desai
Video Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्रीच घेतली आमदारांची बैठक, निवडणुकीचा प्लॅन तयार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com