narayan rane
narayan rane sarkarnama
मुंबई

पुढच्या निवडणुकीत आमचे 160 आमदार असतील

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेने (Shivsena) खुर्चीसाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी हिंदुत्वाशी गद्दारी करुन काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचा (NCP) हात धरला आहे. बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) कधीही हिंदुत्वाशी तडजोड केली नव्हती. मात्र, मागील दोन वर्षात शिवसेना पक्षप्रमुखांनी हिंदुत्वाबाबत काय भूमिका घेतल्या, हे सर्व महाराष्ट्राने बघितले आहे. यांना कारवाई करण्यासाठी फक्त माझेच घरं दिसतं, मात्र बेकायदेशीर भोंगे दिसत नाही का? यांनी कोल्हापूर पॅटर्न जगात राबवला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. पुढच्या निवडणुकीत आमचे 160 आमदार असणार आहेत, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

माझ्या घरासंबधी केलेली कारवाई कायदेशीर केली नसून करण्य़ात आलेली कारवाई ही फक्त राजकारणासाठी केली आहे. पालिका आयुक्तांना केवळ माझं एकट्याचं घर दिसतंय का? इतर ठिकाणी ते डोळे झाकून फिरतात का? तसेच मुख्यमंत्रीही सूडाच्या भावनेने कारवाई करत आहेत. मात्र, अशा कारवायांना मी भीक घालत नाही. अशा कारवाई करून आम्ही शांत बसू असं त्यांना वाटतयं मात्र, त्यांचा तो गैरसमज आहे. माझ्याकडे अनेकांचे रेकॉर्ड आहेत, वेळ आली की उघडे करेन, असा गर्भित इशाराही राणेंनी शिवसेनेला दिला आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसून राज्य दिवाळखोरीत चालल आहे. मुख्यमंत्र्यांची जरब नसून अडीच वर्षांचा कारभार मुख्यमंत्र्यांनी दोन तासांत उरकला आहे. हे सरकार लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाही. हे काय माझ्या अंगावर येतील या टपोरी लोकांना मी उत्तर देत नाही. पैसे मिळवण्याचे एक ठिकाण पालिका झालं असून हे मुंबईचे पैसे लुटत आहेत. तसेच, कोल्हापूर पॅटर्न यांनी जगात राबवला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. पुढच्या निवडणूकित आमचे 160 आमदार निवडूण येतील. हे डबक्यात राहून समुद्राचे माप घेत आहेत, अशा शब्दात राणेंनी मुख्यमंत्र्यांवर व महाविकास आघाडीवक जोरदार हल्लाबोल केला.

दरम्यान, राज ठाकरेंच्या भोंगे हटाव भूमिकेला राणेंनी पाठिंबा देत म्हणाले की, बेकायदेशीर भोंग्यांना आमचा विरोध आहे. जर कारवाई करायला माझं घर दिसते मग यांना बेकायदेशीर भोंगे दिसत नाही का?, असा सवालही राणे यांनी सरकारला विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT