Ganeshotsav 2023 : सप्टेंबरमधील गणेशोत्सवासाठी केंद्र सरकारने गणेशभक्तांसाठी गुड न्यूज दिली आहे. विशेषतः कोकणवासींना आपल्या घरी जाण्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेनं यंदा गणेशोत्सवानिमित्त १५६ रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे.
गणेशोत्सवात आपली घरी जाण्यासाठी गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेनं 'गणपती विशेष रेल्वे'चे नियोजन केलं आहे. याचे बुंकिंग उद्यापासून (ता.२७) सुरु होत आहे. अधिकमाहितीसाठी रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
१) मुंबई- सावंतवाडी रोड स्पेशल (४० सेवा)
(दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकावर थांबणार)
२) लोकमान्य टिळक टर्मिनस- कुडाळ - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (२४ सेवा)
ठाणे, पनवेल, रोहा. माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग या स्थानकावर थांबणार)
३) पुणे- करमाळी/कुडाळ- पुणे विशेष (६ सेवा)
(लोणावळा, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग या स्थानकावर थांबणार)
४) मुंबई - मडगाव विशेष साप्ताहिक (४० सेवा)
(दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकावर थांबणार)
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.