Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांच्या पाहुणचारासाठी केळीचे लाडू, बिस्कीट अन् चिप्स ! ; केळीच्या उपपदार्थांना विशेष दर्जा..

CM Eknath Shinde visit Jalgaon : केळीपासून तयार होणाऱ्या उपपदार्थांना शासनाने मदत केल्यास रोजगारनिर्मिती शक्य आहे.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मंगळवारी (ता.२७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावला येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

जळगावची (खानदेश) केळी जगभर प्रसिद्ध आहे. यामुळे केळीपासून बनविलेल्या उपपदार्थांच्या तब्बल आठ ते दहा बास्केट (टोपली) बनविल्या जात आहे. सोबतच केळीपासून धागाही तयार केला जातो. तोही या वेळी शिंदे-फडणवीसांना दिला जाणार आहे. जेणेकरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे केळी विषयाकडे अधिक लक्ष जाईल.

Eknath Shinde News
Sanjay Sawant slams Gulabrao Patil : गुलाबरावांनी मंत्रीपदासाठी किती वेळा राऊतांच दार ठोठावलं, हे सांगावं..

केळीपासून तयार होणाऱ्या उपपदार्थांसाठी सरकारने विशेष दर्जा दिल्यास रोजगारनिर्मिती शक्य आहे, याची माहिती मंत्र्यांना दिली जाणार आहे. यासोबत आकर्षक केळी, भरित वांगीही दिली जाणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी खानदेशमध्ये प्रसिद्ध असलेल्या केळीपासून बनविलेले लाडू, बिस्कीट, चिप्स आदी पदार्थांनी भरलेली बास्केट तयार केली जात आहे. त्याची जबाबदारी विभागीय कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्याकडे दिली आहे.

Eknath Shinde News
Imtiyaz Jaleel on Navneet Rana : इम्तियाज जलीलांचे नवनीत राणानं खुलं आव्हान ; ओवेसींनी परवानगी दिली तर..

संभाजी ठाकूर म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनोख्या पद्धतीने (केळीचे उपपदार्थ असलेली बास्केट) स्वागत केले जाणार आहे. केळीपासून तयार होणाऱ्या उपपदार्थांना शासनाने मदत केल्यास रोजगारनिर्मिती शक्य आहे. हे आम्ही सरकारला सांगणार आहोत,"

कृषी विभागाच्या योजनेंतर्गत महिला शेतकऱ्यांपैकी एका शेतकरी महिलेला मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ट्रॅक्टरवाटप करण्यात येणार आहे. एकूण २० कृषी वाहने, अवजारांचे या वेळी वाटप होईल. कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहितीचे फलक लावण्यात येणार आहे. तृणधान्य वर्ष असल्याने तृणधान्याच्या फायद्याचे महत्व कृषी विभागातर्फे पटवून दिले जाणार आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com