Mumbai High Court Sarkarnama
मुंबई

22 Jan Public Holiday : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुटीच्या निर्णयाला आव्हान; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल!

Mayur Ratnaparkhe

Mumbai News : अयोध्येतील श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे. यानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली असून, केंद्र सरकारच्यावतीने सर्वच शासकीय कार्यालयांना अर्धा दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे.

त्यानंतर महाराष्ट्रानेही राज्यात 22 जानेवारीला सुटीच जाहीर केली आहे. सरकारने याबाबतचा अध्यादेश जाहीर केला आहे. दरम्यान, देशभरातील आठ राज्यांनी सुटी जाहीर केली असून इतर राज्यांत सुटी जाहीर करण्याची मागणी होत आहे.

तर या सुटीला आक्षेप घेत विधी विभागाच्या शिवांगी अग्रवाल, सत्यजित साळवे, वेदांत अग्रवाल, खुशी बांगिया या चार विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच या याचिकेवरील सुनावणीसाठी रविवारी विशेष खंडपीठ स्थापन करण्याची मागणीसुद्धा करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारने या दिवशी सुटी जाहीर केल्याने शैक्षणिक संस्था बंद राहणार असल्याने, विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याशिवाय, बँका, शासकीय कार्यालयांसह अन्य कार्यालयं बंद राहिल्यास प्रशासकीय कामांचे नुकसान होईल, असा दावाही याचिकेतून करण्यात आला आहे.

एवढच नाही, तर देशभक्त व्यक्तिमत्त्व किंवा ऐतिहासिक व्यक्तीच्या स्मरणार्थ सुटी जाहीर केली जाऊ शकते, मात्र समाजातील विशिष्ट वर्गास किंवा धार्मिक समुदायास खुश करण्यासाठी सुटी जाहीर करणे चुकीचे असल्याचेही म्हटले आहे.

देशातील महाराष्ट्रासह इतर सात राज्यांनी सुटी जाहीर केलेली आहे. छत्तीसगड, गोवा, ओडिशा, राजस्थान, आसाम, मध्य प्रदेश, हरियाना या राज्यांत सार्वजनिक सुटी असणार आहे, तर केरळ, झारखंडमध्ये सुटीची मागणी करण्यात येत आहे. मात्र आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तमिळनाडू, त्रिपुरा, तेलंगणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख, लक्षद्वीप, पुद्दुचेरी येथे अद्याप सुटी जाहीर केलेली नाही.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT