Chandrakant patil | Radhakrushn Vikhe Patil
Chandrakant patil | Radhakrushn Vikhe Patil Sarkarnama
मुंबई

'महसूल'साठी चंद्रकांतदादा-विखे पाटलांमध्ये चुरस : खातेवाटपचा अजुनही तिढा कायम

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिंदे सरकारचा (Eknath Shinde) शपथविधी पार पडून २ दिवस उलटले, मात्र अद्याप खातेवाटप जाहीर करण्यात आलेले नाही. खाते वाटप रखडल्याने सर्वच मंत्री बिनखात्याचे बनले आहेत. काल (बुधवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी प्रत्येकी दोन ते तीन खात्यांचे पर्याय मुख्यमंत्री शिंदेंना दिल्याची माहिती मिळत आहे. खाते वाटप लवकरच जाहीर होईल असे शिंदे आणि फडणवीसांकडून सांगितले जात आहे. दरम्यान अद्याप काही खात्यांवर तिढा कायम असून तो आज संध्याकाळपर्यंत सुटून आज रात्रीच खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. (cabinet expansion of Shinde Government)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन जेष्ठ मंत्र्यांमध्ये महसूल खात्यासाठी (Revenue Ministry) चुरस रंगली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) हे दोघेही महसूलसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही आहेत. फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांना २ नंबरच्या मंत्र्यांचा दर्जा होता. त्यावेळी त्यांच्याकडे एकावेळी सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत आणि पुनर्वसन, सहकार, कृषी अशा खात्याचे मंत्री होते. त्यांना उपमुख्यमंत्रीपदाचा दर्जा होता. तसेच फडणवीसांच्या अनुपस्थितीमध्ये ते प्रभारी मुख्यमंत्री मानले जायचे. त्यामुळे या मंत्रिमंडळात त्यांना वजनदार खात्याची अपेक्षा आहे.

याशिवाय आता राधाकृष्ण विखे पाटील हे देखील मंत्रीमंडळात आले आहेत. ते सातव्यांदा आमदार आणि सातव्यांदा मंत्री झाले आहेत. मंत्रिमंडळात ते चंद्रकांत पाटील यांच्यापेक्षा जेष्ठ समजले जातात. त्यामुळेच शपथविधीवेळी देखील विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली होती. याच कारणामुळे विखे पाटील यांनाही सन्मान राखला जाईल आणि त्यांच्या जेष्ठतेला शोभेल असेच खाते त्यांना हवे आहे. त्यातचं गृह आणि अर्थ ही दोन खाती देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळेच या दोन मंत्र्यांमध्ये महसूल खात्यासाठी चुरस रंगली आहे.

अशी असतील संभाव्य खाती...

1) एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री (नगरविकास)

2) देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) गृह आणि अर्थ

3) राधाकृष्ण विखे पाटील - महसूल, सहकार

4) सुधीर मुनगंटीवार - ऊर्जा, वन

5) चंद्रकांत पाटील - सार्वजनिक बांधकाम

6) विजय कुमार गावित- आदिवासी विकास

7) गिरीश महाजन - जलसंपदा

8) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा

9) दादा भुसे- कृषी

10) संजय राठोड- ग्राम विकास

11) सुरेश खाडे - सामाजिक न्याय

12) संदीपान भुमरे- रोजगार हमी

13) उदय सामंत - उद्योग

14) तानाजी सावंत- उच्च तंत्र शिक्षण मंत्री

15) रवींद्र चव्हाण- गृह निर्माण

16) अब्दुल सत्तार- अल्पसंख्यांक विकास

17) दीपक केसरकर- पर्यटन आणि पर्यावरण

18) अतुल सावे - आरोग्य

19) शंभूराज देसाई- उत्पादन शुल्क

20) मंगलप्रभात लोढा- विधी व न्याय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT