BJP News: राज्यातील सरकारच्या जन्मापासूनच अवाजवी टीका होतेय

भाजप नेते आशीष शेलार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टिका केली.
Ashish Shelar
Ashish ShelarSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सरकारवर विरोधी पक्ष (Opposition) अवाजवी टिका करीत आहे. हे सरकार कसे बनले यावर आलोचना, मंत्रीमंडळ बनत नव्हतं तेव्हा आलोचना आणि आता बनलं तेव्हा आलोचना. विरोधी पक्षाने टिकेचे महत्त्वच कमी केले, अशी नाराजी भाजप (BJP) नेते आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केली. (Opposition down the vallue of criticism on State Governmant)

Ashish Shelar
Nashik News: झेंडावंदन कोण करणार? गिरीश महाजन की दादा भूसे?

मंत्रीमंडळ विस्तारानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसवर टिका केली. ते म्हणाले, लोकशाहीत टीकेचे एक स्थान असते आणि महत्व असते. आज विरोधीपक्षाने राज्याच्या राजकारणात टीकेचे महत्व कमी करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र राज्यातील जनता डोळे बंद करून नाही.

Ashish Shelar
Balasaheb Thorat: भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हेच उद्दिष्ट

ते पुढे म्हणाले, जे टीका करत आहेत त्यांनी स्वतःच्या भुतकाळाकडे देखील बघायला हवं. स्वतःच्या पक्षातील किती नेते जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर ही वेळ का आली, याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.

बिहारमधील राजकीय घडामोडींबाबत त्यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, सुशील मोदी यांनी शिवसेनेवर टिका केली. शिवसेनेचा उल्लेख केला असेल तर त्यात चूक काय?. शिवसेना आपापसात असलेल्या द्वंदामुळेच फुटली. बाळासाहेबांच्या विचारावर राहिली असली तर फुटली नसती. हे द्वंद का झाले याचा विचार त्यांनीच करावा.

शेलार पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे आमच्या सोबत होते तेव्हा त्यांच्याकडे राष्ट्रभक्त आणि हिंदुत्व होते. आता ते राहिले नाही त्यामुळे आमदारांनी वेगळी वाट धरली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसंदर्भात भाजपच्या भूमिकेवर टिका केली आहे. याबाबत शेलार म्हणाले, ते फार मोठे नेते आहेत पण ज्यांचा जन्म स्वपक्ष आणि दुसरे पक्ष फोडून झाला त्यांनी हे बोलू नये. शरद पवार यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र राष्ट्रवादी पक्ष काही निवडुक आयोग नाही. त्यांनी भाजपने कसे वागले पाहिजे याचे मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे का?. त्यांनी त्यांचे मत मांडावे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com