Chandrakant Patil Latest News
Chandrakant Patil Latest News sarkarnama
मुंबई

चंद्रकात पाटील म्हणतात, चालू राजकीय घडामोडींशी भाजपचा काहीही संबंध नाही

सरकारनामा ब्यूरो

Chandrakant Patil: शिवसेनेचे (Shivsena) नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत व राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नसल्याचे भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे. त्यांनी शुक्रवारी (ता. 24 जून) कोल्हापूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (Chandrakant Patil Latest Marathi News)

पाटील म्हणाले की, भाजपाकडे कोणीही सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव सादर केलेला नाही. भाजपच्या निर्णयप्रक्रियेनुसार महत्त्वाच्या विषयांवर राज्याची कोअर कमिटी विचारविनिमय करून भूमिका निश्चित करते व केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करते. त्यानंतर पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम निर्णय घेते, असे पाटील यांनी सांगितले.

शिवसेनेच्या दोनतृतियांशपेक्षा अधिक आमदारांनी वेगळी भूमिका घेण्याच्या घडामोडीमागे भाजपा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. यावर पाटील म्हणाले की, देशामध्ये सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून तसेच ते शरद पवार यांनाही आहे. त्यानुसार ते आपले मत व्यक्त करत असतात, अशी पवारांबद्दल संयमी प्रतिक्रिया पाटलांनी दिली आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार नाही. तथापि, अंतर्गत कलहामुळेच हे सरकार कोसळेल, असे आपण यापूर्वी सातत्याने म्हणत होतो, अशीही आठवण त्यांनी करून दिली.

दरम्यान, शिवसेनेतील बंडाच्या नाट्यातील दुसऱ्या अंकाची सुरूवात झाली आहे. सुरूवातीला शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंकडून प्रयत्न करण्यात आले. पण त्यानंतरही शिंदे माघार घेण्यास तयार नसल्याने आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे.

शिंदे यांच्या गटात असलेल्या सुमारे 40 आमदारांपैकी 12 आमदारांवर पक्षाचा‘व्हीप’डावलल्याचा ठपका ठेवून अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र सेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले आहे. त्यानंतर आज आणखी पाच आमदारांची त्यात भर पडली असून सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे यांचे निलंबन करण्याची मागणी सेनेकडून करण्यात आल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT