chandrakant patil latest news 
basavraj bommai news
chandrakant patil latest news basavraj bommai news Sarkarnama
मुंबई

Chandrakant Patil: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चंद्रकांत पाटलांचं रोखठोक प्रत्युत्तर; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Chandrakant Patil News : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूरसह जत तालुक्यातील काही गावांवर दावा सांगितल्यामुळे सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच तापला आहे. यावरुन राज्यातील राजकारण देखील चांगलंच देखील ढवळून निघालं आहे. आता याचदरम्यान,कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये गर्भित इशारा दिला आहे. आता भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जशास तसं प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे सीमावाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बेळगावी येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करावी अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका आहे. त्यानुसार मंत्री चंद्रकांत पाटील आणि समन्वयक मंत्री शंभुराज देसाई ३ डिसेंबर रोजी दिवसभर बेळगाव येथे जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार होते. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असं वक्तव्य केल्यानं पुन्हा एकदा सीमावाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाटील आणि देसाई यांचा बेळगाव पुढे ढकलला असून हा दौरा येत्या ६ डिसेंबर रोजी हा दौरा होणार आहे. याबाबतची माहिती पाटील यांनी टि्विट करुन केली आहे. पाटील यांनी चर्चेतून मार्ग निघतो असे देखील म्हटले होते. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असं वक्तव्य केल्यानं पुन्हा एकदा सीमावाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय म्हणाले बसवराज बोम्मई?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सध्याची कर्नाटक-महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये असा इशारा दिला आहे. तसेच सीमेपलीकडील सीमेपलीकडील जनता देखील आपलीच आहे, त्याठीकाणच्या कन्नड शाळांचा विकास होत नाही. शाळांना मुलभूत सुविधा मिळत नाहीत. कोणत्याही राज्यातील कन्नड शाळांना कर्नाटक सरकार अनुदान देणार आहे. सीमेच्या आतील आणि सीमेपलीकडील शाळांसाठी अनुदान १०० कोटींचे अनुदानाची तरतूद करण्यात येईल. तसेच सोलापूरमध्ये कन्नड भवन बांधण्यासाठी १० कोटी मंजूर केले आहेत असे देखील बोम्मई यावेळी म्हणाले होते.

मात्र, आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील बोम्मई यांना जशास तसं प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी पाटील म्हणाले, आम्हांला कर्नाटकमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं वक्तव्य केल्यानं सीमावाद पुन्हा तापणार असल्याची चिन्हं आहेत.

चंदकांत पाटलांचा बेळगाव दौरा पुढे ढकलला...

महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलेल्या निमंत्रणावरुन सीमा समन्वयमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई बेळगावच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या ६ डिसेंबर रोजी हा दौरा होणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी हा दौरा ३ डिसेंबरला नियोजीत होता. मात्र ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यासाठी आता हा दौरा ६ डिसेंबरला होणार आहे.

पाटील आणि देसाई यांचा बेळगाव पुढे ढकलला असून हा दौरा येत्या ६ डिसेंबर रोजी हा दौरा होणार आहे. याबाबतची माहिती पाटील यांनी टि्विट करुन केली आहे. पाटील यांनी चर्चेतून मार्ग निघतो असे देखील म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT