छगन भुजबळ

 

सरकारनामा

मुंबई

चंद्रकांतदादा-फडणवीसदादा ओबीसींसाठी दिल्लीला जा; हवे तर मी तिकीट काढून देतो

भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी ओबीसी आरक्षणाबाबत लोकसभेत केलेले भाषण भुजबळ यांनी वाचून दाखविले.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्यात भाजपाचे नेते केंद्र सरकारकडे जाऊन ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत.चंद्रकांतदादा (Chandrakant Patil) आणि फडणवीसदादा (Devendra Fadanvis) तुम्हीपण दिल्लीला जा. हवे तर तुमचे तिकीट मी काढून देतो, असे सांगत ओबीसींच्या प्रश्‍नावर भाजपा नेत्यांनी केंद्राकडे प्रयत्न करावेत, अशी भावना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी आज विधानसभेत व्यक्त केली.

आरक्षणाच्या विषयावर आज विधानसभेत विधेयक मांडल्यानंतर त्यावर चर्चा झाली.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्यात या विषयावरून शाब्दीक चकमक झाली.आरक्षणाच्या विषयावरून राजकारण न करता ओबीसींचे आरक्षण मिळविण्यासाठी इम्पिरिकल डाटा तयार करण्यासाठी राज्य सरकारने कामाला लागावे, असे फडणवीस यांनी सांगितले.इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम वेगाने सुरू करण्याऐवजी केंद्र सरकारकडून डाटा मिळत नाही, असा आरोप करण्यात वेळ घालवला जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.केंद्र सरकारकडे असलेली माहिती सामाजिक व अर्थिक पाहणी आहे. राजकीय आरक्षणासंदर्भाने त्यात माहिती नाही.जातनिहाय जी माहिती आहे त्यात अनेक चुका आहेत. त्यामुळे ती माहिती देता येणार नसल्याचे यापूर्वीच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारला दोष देत राजकारण करण्यात अर्थ नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत लोकसभेत केलेले भाषण भुजबळ यांनी वाचून दाखविले.ओबीसी आरक्षणासाठी सर्व्गीय मुंडे आग्रही होते. ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी यासाठीदेखील त्यांनी आग्रही मागणी केली होती, अशी आठवण भुजबळ यांनी सांगितली. मध्यप्रदेशसह भाजपाशासीत राज्यातील मुख्यमंत्री आरक्षणाच्या विषयात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. राज्यातील भाजपा नेत्यांनीदेखील पाठपुरावा करावा. त्यातून राज्यातील ओबीसींचा फायदा होईल, असे सांगत चंद्रकांतदादा, फडणवीसदादा तुम्ही दोघे दिल्लीला जा हवे तर मी तिकीट काढून देतो, असा चिमटा काढला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT