Chandrakant Patil-Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

चंद्रकांतदादांचे आव्हान : हिंमत असेल तर राऊतांनी गोव्यातून निवडणूक लढवावी

रोज उठून भाषण करणे सोपे असते हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : गोवा विधानसभा निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांना पाठिंब्याची चर्चा करण्यापेक्षा हिंमत असेल तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वत: गोवा विधानसभा निवडणुकीला उभे राहावे, असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले.

गोवा विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी उभे राहावे, शिवसेना त्यांना पाठिंबा देईल, असे विधान खासदार राऊत यांनी केले होते. त्यावर बोलताना पाटील यांनी खासदार राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘ महाराष्ट्रात बसून पर्रीकर यांना पाठिंब्याची भाषा करणे सोपे आहे. प्रत्यक्षात तिकडे यांना कोण विचारतो. मुंबईत राहून अशा गप्पा मारण्यापेक्षा खासदार राऊत यांनी गोव्यात जाऊन एखाद्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधून जाऊन उत्तर प्रदेशात निवडणूक लढवतात तसे धाडस खासदार राऊत यांनी दाखवावे. ’’

पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढविली तर भाजापाच्या विरोधातील सर्व पक्ष पर्रीकर यांना पाठिंबा देतील, अशी चर्चा सोशल मिडीयात सुरू झाली आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले, ‘‘गोव्यात अद्याप पर्रीकरांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली नाही. मात्र, पर्रीकर यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाली तर पर्रीकरांविषयी प्रेमाने बोलणारे सर्व राजकीय नेते व त्यांचे पक्ष पर्रीकरांना बिनविरोध निवडून देतील का ?’’

रोज उठून भाषण करणे सोपे असते हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावे.प्रत्यक्ष निवडणूक लढविणे अवघड असते.गोवा निवडणूक व पर्रीकरांच्या उमेदवारीबाबत बोलणाऱ्या राऊतांना तिकडे गोव्यात कोण विचारतो, असेही पाटील यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांना भाजपा उमेदवारी देणार की नाही या विषयावरून सध्या चर्चा सुरू आहे. या विषयात भाजपाविरोधोतील सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता असल्याचे त्यावर अधिक चर्चा होत आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT