पुण्यात मेट्रोची ट्रायल; राष्ट्रवादी आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम करतेय

राज्य सरकार प्रत्येक गोष्ट करताना विरोधी पक्षाला शत्रूसारखी वागणूक देत आहे.
Chandrakant Patil Statement on Metro Trial
Chandrakant Patil Statement on Metro TrialSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : पुणे मेट्रोसह सर्वच सरकारी यंत्रणा सध्या राज्य सरकारच्या दबावाखाली काम करीत आहेत.पुण्यात मेट्रोच्या घेण्यात आलेल्या ट्रायलच्यावेळी महापौरांसह भाजपाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना टाळण्यात आले. हा सारा प्रकार म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे, अशी टीका करीत पुणे-पिंपरीच्या मेट्रोचे श्रेय सर्वस्वी भारतीय जनता पार्टीचे आहे, या शब्दात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज राष्ट्रवादीला ठणकावले. (Chandrakant Patil Statement on Metro Trial)

Chandrakant Patil Statement on Metro Trial
शोषित, वंचितांचा आवाज हरपला; प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

राज्य सरकार प्रत्येक गोष्ट करताना विरोधी पक्षाला शत्रूसारखी वागणूक देत आहे, असा आरोपही पाटील यांनी केला आहे. पाटील म्हणाले, ‘‘ पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोची ट्रायल घेण्यात आली. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपाच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला कल्पनादेखील देण्यात आली नाही.वास्तविक हा संपूर्ण प्रकल्प सुरू करून पूर्णत्वाला नेण्यासाठीचे सर्व श्रेय भारतीय जनता पार्टीच्या तत्कालिन राज्य सरकार व विद्यमान केंद्र सरकारचे आहे. पुणे महापालिकेतदेखील भाजपा सत्तेत आहे.

Chandrakant Patil Statement on Metro Trial
अन्यायाविरूद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे व्यक्तीमत्व हरपले...

पाटील म्हणाले, ‘‘ १८ जानेवारीला मेट्रो प्रकल्पाच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या पहिल्या टप्यातील मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र, देशातील कोरोना स्थितीमुळे स्वत: पंतप्रधनांनी उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे घेण्याची विनंती केल्याने हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. यापूर्वी मेट्रोची ट्रायल घेण्यात आली होती. मात्र, मेट्रो कंपनीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा ट्रायल घेतली. पवार यांच्या उपस्थितीला आमचा आक्षेप नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत. राजकीय जीवनात त्यांनी पन्नास वर्षे व्यतीत केली आहेत. मात्र, ट्रायल घ्यायची होती तर त्यासाठी पुण्याचे महापौर व खासदारांसह सर्वच आमदारांना निमंत्रित करणे योग्य ठरले असते.मेट्रो कंपनीने लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना न बोलिविण्याची चूक केल्याने मेट्रो विरोधात हक्कभंग मांडण्यात येणार आहे.’’

मेट्रोसह सरकारी यंत्रणा सध्या राज्य सरकारच्या दबावाखाली काम करीत असून राज्य सरकार आमच्याशी विरोधी पक्षाशी वागावे तसे न वागता शत्रूसारखा व्यवहार करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com