Mumbai, 03 March : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने मुंबईत आजपासून (ता. 03 मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन तब्बल तीन आठवडे चालणार आहे. अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे चॉकलेट डिप्लोमसी राबवतात. आजही चंद्रकांतदादा चॉकलेट घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबदास दानवेंच्या दालनात पोचले. चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा हास्याच्या स्फोट झाला. मात्र, माजी मंत्री अनिल परब यांच्या विधानानंतर मात्र चंद्रकांतदादांनी हात जोडत दानवेंच्या दालनातून काढता पाय घेतला.
अधिवेशन काळात दोन्ही सभागृहातील कामकाज सुरळीतपणे पार पडावे, यासाठी राज्याचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे चॉकलेट डिप्लोमसी राबवतात. सभागृहात सर्वांनी गोडीगुलाबीत वागावं. एकमेकांविषयी कटू भाषेचा वापर करू नये, यासाठी चंद्रकांतदादांचा प्रयत्न असतो. त्यामुळे ते विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांच्या दालनात जाऊन चॉकलेट देत असतात.
चंद्रकांत पाटील हे आजही चॉकलेट घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात पोचले. दानवेंच्या दालनात शिवसेना नेत्यांची अगोदरच बैठक सुरू हेाती. चंद्रकांत पाटील आणि त्यांच्यासोबत भाजप आमदार संजय सावकरेही होते. चंद्रकांतदादा दालनात पोचताच सर्व जण उठून उभे राहिले आणि त्यानंतर सर्व दालन हास्यकल्लोळात बुडाले.
चंद्रकांत पाटील हे दानवे आणि आदित्य ठाकरे यांना चॉकलेट देतात, त्याचवेळी आमदार सचिन अहिर हे चंद्रकांतदादांनी एकच चॉकलेट आणले आहे, असा टिपण्णी करतात. त्यानंतर फोटोसेशनसाठी आदित्य ठाकरे सर्वांना बोलवतात. त्या वेळी चंद्रकांतदादांनी अनिल परब यांना उद्देशून ‘अनिलजी, असं व्यक्तिमत्व आहे की, कुठेही उभे राहिले तरी ते फोटोत येतात,’ असा टोमणा मारतात.
चॉकलेट देऊन जाताना अनिल परब हे चंद्रकांत पाटलांना ‘विरोधी पक्षाकडे जरा लक्ष राहू द्या’ अशी विनंती करतात. त्या वेळी ते वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्याबाबत बोलतात. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत मी आणि वरुण सदेसाई अनेकदा भेटलोय, अशी आठवण सांगतात. तेवढ्या परब म्हणतात, त्यांना काही विचारायला तरी द्या, असेही आवाहन परबांनी केले.
वरुण सरदेसाई तुम्ही विधानसभेत जास्त वेळ थांबा, असा सल्लाही चंदकांतदादांनी दिला. त्यानंतर तुम्हाला फिल्डवर जास्त सक्रीय व्हायचे आहे, असा संवाद चालेला असतानाच परब म्हणतात त्यांनी काही तरी विचारायला तरी द्या. त्यावर कोणाला असा सवाल चंद्रकांत पाटील विचारतात. तेव्हा वरुण सरदेसाई मला म्हणतात, तेव्हा एकच हशा पिकतो. तसेच, अनिल परब हे माझे तर सगळं मार्ग मोकळे झाले आहेत, बोलण्याचं, असा म्हणतात चंद्रकांतदादांनी हात जोडून काढता पाय घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.