Chandrakant Patil : '10 कोटीचा रेडा मी घेतो पण ते...', चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

Chandrakant Patil Agricultural Exhibition : चंद्रकांत पाटील म्हणाले, कृषी प्रदर्शन म्हणून कृषी पूरक माहिती घेण्यास येणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे अभ्यासपूर्ण माहिती घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे.
Agricultural Exhibition
Agricultural Exhibitionsarkarnama
Published on
Updated on

Chandrakant Patil News: राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून भीमा कृषी प्रदर्शनाचा आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे 'विधायक' नावाचा भला मोठा रेडा. रेड्याच्या मालकाकडून त्याची किंमत 25 कोटी असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे हा रेडा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून गर्दी उसळली होती.

या कृषी प्रदर्शनाच्या या कार्यक्रमाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनापासून ते शेवटपर्यंत या रेड्याची चर्चा असल्याने मंत्री पाटील यांना देखील 'विधायक'ला बघण्याची उत्सुकता होती.

कृषिप्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी 'विधायक' या रेड्याचा उल्लेख केलाच. तत्पूर्वी या रेड्याबद्दलची माहिती मंत्री पाटील यांनी घेतली होती. भाषणात बोलताना ते म्हणाले, 'कृषी प्रदर्शनात 10 कोटीचा रेडा मी घेतो. पण ते विकत कस काय नाही. याबाबत मला आश्चर्य वाटते. '

Agricultural Exhibition
Sharad Pawar : एकनाथ शिंदेंच्या 'ऑपरेश टायगर' आणि 'हलके में मत लो'वर शरद पवार बरसले; म्हणाले, 'मराठीत हा शब्दच नाही’

'केवळ कृषी प्रदर्शन म्हणून इकडे येण्याची संख्या फार कमी आहे. अनेक जण आज बायकोला घेऊन रेडा बघायला आले. तर कोण मुलाबाळांना घेऊन रेडा दाखवायला आले', चंद्रकांत पाटील यांनी असे म्हणताच सर्वत्र हशा पिकला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'कृषी प्रदर्शन म्हणून कृषी पूरक माहिती घेण्यास येणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे अभ्यासपूर्ण माहिती घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे.

कृषी प्रदर्शनाच्या सांगता सोहळ्यात धनंजय महाडिक यांचे भाषण सुरू असताना पालकमंत्री आबिटकर यांची एन्ट्री झाली. त्या वेळी महाडिक म्हणाले, जीन्स पॅन्ट घातलेला आमचा तरुण पालकमंत्री यांनी कोल्हापूर जिल्ह्यात कामाचा धडाका लावलाय.

Agricultural Exhibition
Ambadas Danve : अंबादास दानवेंनी नीलम गोऱ्हेंना डिवचले; म्हणाले, 'हा तर नमकहरामीपणा...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com