Uddhav Thackeray,Chandrasekhar Rao sarkarnama
मुंबई

मोदींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यासाठी चंद्रशेखर राव घेणार मुख्यमंत्री ठाकरेंची भेट

देशातील भाजप आणि केंद्र सरकारच्या दबावाविरोधात बिगर भाजप शासित राज्यज्यांचे मुख्यमंत्री एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Chandrasekhar Rao)यांना दूरध्वनी करून येत्या रविवारी मुंबईत भेटीला येण्याचे निमंत्रण दिले. उद्धव ठाकरे यांनी राव यांना भोजनाचं आमंत्रण दिल्यानं राव मुंबईत येणार आहेत.

याआधी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्या तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. राष्ट्रपति निवडणुकीपूर्वी विविध राज्याचे मुख्यमंत्री भाजपला विरोध करण्यासाठी एकत्र येत आहेत.

या भेटीत राजकीय मोट बांधण्याचा दोन्ही प्रादेशिक पक्षांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. बिगर भाजप शासित मुख्यमंत्र्यांची एकजूट करण्याचा राव यांचा प्रयत्न आहे. देशातील भाजप आणि केंद्र सरकारच्या दबावाविरोधात बिगर भाजप शासित राज्यज्यांचे मुख्यमंत्री एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राव आणि ठाकरे यांच्या रविवारी होणारी बैठक महत्वाची मानली जाते.

केंद्रातील मोदी सरकारचा बिगर भाजपशासित राज्यांबाबतचा दृष्टिकोन नेहमीच वेगळा राहिला. केंद्राची मदत, राज्यांचे हक्क किंवा केंदाचा हस्तक्षेप यावरून केंद्र व या राज्यांमध्ये नेहमीच तीव्र मतभेद होतात. महाराष्ट्राची आर्थिक तसेच सर्वच आघाड्यांवर कोंडी करण्याचा केंद्रातील भाजप सरकार प्रयत्न करते, असा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप असतो.

यंदा तेलंगणातील सर्व भात खरेदी करण्यास केंद्राने नकार दिला. यामुळे चंद्रशेखर राव यांची आर्थिक व सामाजिक कोंडी झाली. सर्व भात खरेदी करण्यासाठी तिजोरीत तेवढे पैसे नाहीत. भाजपकडून कोंडी केली जात असल्यानेच चंद्रशेखर राव यांनी भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्यांचे अधिकार आणि केंद्रातील भाजप सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपावरून प्रादेशिक पक्षांचे सारेच मुख्यमंत्री संतप्त आहेत. प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची आघाडी असे या एकजुटीचे वर्णन केले जात आहे. केद्राकडून सध्या काही राज्यांची कोंडी केली जाते. त्यातूनच राज्यांचा दबावगट तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्या-त्या राज्यातील प्रादेशिक पक्षांनी भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला या राज्यांमध्ये अधिक कठोर सामना करावा लागेल. कारण महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा या राज्यांमध्ये भाजपला यशाची अपेक्षा आहे. भाजपकडून दबाव टाकण्यात आल्यास संघटितपणे सामना करण्याची या मुख्यमंत्र्यांची योजना असल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT