हातात चप्पल घेऊन किरीट सोमय्या राऊतांना म्हणाले..

19 बंगल्यांबाबत जे वक्तव्य त्यांनी केलं ते खरं असेल तर मी राजकारण सोडून देईन
हातात चप्पल घेऊन किरीट सोमय्या राऊतांना म्हणाले..
sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) हे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर गंभीर आरोप करीत आहेत. यावर मंगळवारी शिवसेनेचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्यांवर हल्लाबोल केला. त्याला बुधवारी सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले. पत्रकार परिषदेत आज सोमय्यांनी थेट चप्पल काढली.

अलिबागमधल्या कोरवाई गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या नावावर १९ बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. यावर ठाकरे कुटुंब आणि त्या बंगल्यांच काहीही संबंध नाही, असं सांगत राऊतांनी ''किरीट सोमय्यांनी हे बंगले दाखवावे. अन्यथा खोटे आरोप करणाऱ्या सोमय्या यांना जोड्याने मारू असा इशारा राऊतांनी दिला होता. ''किरीट सोमय्या खोटी माहिती पुरवत आहेत. 19 बंगल्यांबाबत जे वक्तव्य त्यांनी केलं ते खरं असेल तर मी राजकारण सोडून देईन. खोटं असेल तर मात्र मुलुंडच्या दलालाला जोड्याने मारू,'' असे राऊत म्हणाले.

''संजय राऊत यांना मीच माझा जोडा देतो, त्या आधी रश्मी ठाकरे यांनी त्या बंगल्यांचा टॅक्स का भरले याचं उत्तर द्यावं, नाहीतर जोडे मारण्यासाठी संजय राऊत यांना मी माझा जोडे देतो,'' असं आव्हान सोमय्यांनी राऊतांनी आज दिलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या पायातील जोडे हातात घेऊन दाखवले.

सोमय्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत १९ बंगले दिसले की की जोडे मारू, असं संजय राऊत म्हणाले, राऊत यांना नेमकं कोणाला जोडे मारायचे आहेत, असा उपरोधिक सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. यावेळी त्यांनी रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाचे कर भरल्याची कागदपत्र दाखवली.

हातात चप्पल घेऊन किरीट सोमय्या राऊतांना म्हणाले..
पिंपरीत भाजपला पहिला झटका, नाराज नगरसेवकाने आरोप करीत दिला राजीनामा

''मी ग्रामपंचायतीतून याबाबत काही पुरावे मिळवले आहेत. हे घर वनविभागाच्या जमिनीवर बांधण्यात आलं आहे. त्यात ग्रामपंचायतीने रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्यातर्फे ३० जानेवारी २०१९ रोजी घरपट्टी नावे करण्याचा अर्ज आला असून मान्य करण्यात आल्याचं नमूद आहे. रश्मी ठाकरेंच्या नावाने घरं दाखवत आहेत. इतकंच नाही तर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी एप्रिल २०१४ मध्ये करार केला. त्यात घरं असल्याचे पुरावे त्यांनी जोडले आहेत. किरीट सोमय्या, नील सोमय्या यांनी जोडलेले नाहीत. हे घर वनविभागाच्या जमिनीवर बांधण्यात आलं आहे,'' असा टोला सोमय्यांनी लगावला आहे.

''हा ठाकरे सरकारच्या ग्रामपंचायतीने दिलेला पुरावा आहे. २००९ पासून दरवर्षी या बंगल्याचा कर भरला जात आहे. आधी अन्वय नाईक आणि नंतर रश्मी ठाकरे, मनिषा वायकर हा कर भरत होत्या,'' असे सोमय्या म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com