Maharashtra Political News : आम्ही महायुती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच विधानसभा लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलेले आहे. आता राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली सुरू आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाकडून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची रणनीती आखली जात आहे. असे असताना आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी राज्यात पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असणार असल्याचे सूचक विधान केले आहे.
बावनकुळे म्हणाले, केंद्रीय मंत्री अमित शाह Amit Shah यांनी स्पष्टपणे सांगितले की महायुतीचे सरकार येणार आहे. हे सरकार आल्यांनंतर मुख्यमंत्री पदासाठी कुणाचाही वाद नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेतच. मात्र विधानसभेत सर्वात जास्त जागा भाजप लढणार आहेत. त्यामुळे जास्त जागा असल्याने भाजपच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल, असेही बावनकुळेंनी स्पष्ट केले.
राज्यात आगामी सरकार हे भाजपच्या नेतृत्वात स्थापन होईल, या बावनकुळेंच्या विधानाने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत. बावनकुळे अप्रत्यक्षपणे राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होणार, असे सूचवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे जागा वाटपापूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीत, ज्याचे आमदार त्याची जागा या सूत्रानुसार भाजपच्या वाट्याच्या 106 जागा फिक्स आहेत. मात्र भाजपच्या नेत्यांनी 160-170 हून कमी जागा लढवणार नसल्याचे आतापासूनच सांगायला सुरूवात केलेली आहे. तसे झाले तर राज्यातील 288 पैकी सर्वात जास्त जागा हा भाजप पक्ष लढवण्याची शक्यता आहे. त्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून येतील असा विश्वासही भाजपच्या नेत्यांना आहे.
दरम्यान, 2019 ला सर्वात जास्ता 106 जागा जिंकूनही युती टिकली नाही. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि महायुतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस यांच्या वाट्याला मात्र उपमुख्यमंत्री पद आले. या पार्श्वभूमीवर राज्यात आगामी सरकार भाजपच्या नेतृत्वात सरकार येणार असल्याचे सूचक विधान केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.