Chandrashekhar Bawankule suresh dhas dhananjay munde .jpg Sarkarnama
मुंबई

Suresh Dhas Vs Dhananjay Munde : सुरेश धस अन् धनंजय मुंडे यांच्या संघर्षात मोठा ट्विस्ट; दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त भेट; बावनकुळेंची मोठी कबुली

Chandrashekhar Bawankule On Suresh Dhas And Dhananjay Munde Meeting : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता दोन महिने पूर्ण झाले आहे. या प्रकरणात गंभीर आरोप केले जात असल्यामुळे राज्याचे अन्नपुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप केले जात आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोरही दिवसागणिक वाढला आ

Deepak Kulkarni

Mumbai News: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस रान पेटवलं होतं. आका, मोठा आका असा उल्लेख करत त्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला होता. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांकडून केले जात होते.

पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेणं दूरच पण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीत स्थान देण्यात आलं आहे.अशातच आता भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि धनंजय मुंडेंमध्ये यांच्यातील संघर्षात एक मोठा ट्विस्ट आला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये भेट घेण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आलं आहे.

आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोठी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी सुरेश धस,धनंजय मुंडे आणि मी असं साडेचार तास आम्ही एकत्र होतो. आणि यावेळी त्यांनी मुंडे आणि धस यांच्यात मतभेद आहेत मनभेद नाही, ते दोघेही खूप इमोशनल आहेत,असा खुलासा केला आहे. ती आमची पारिवारिक भेट होती, आणि पुढील काळात या दोघांमधील मतभेद मिटलेले आपल्याला दिसतील, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) सध्या चांगलेच वादात सापडले आहेत.विरोधकांमार्फत रोज त्यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा केली जात आहे. याच कारणामुळे त्यांना पालकमंत्री सुद्धा करण्यात आलेले नाही. पण भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे विरोधात आक्रमक भूमिका घेत बीडचं राजकारण तापवलं होतं. पण या दोन्ही नेत्यांमध्ये एकदा नव्हे तर दोनदा बैठक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे धस आपली मुंडेविरोधातली तलवार म्यान करणार का अशी चर्चा आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता दोन महिने पूर्ण झाले आहे. या प्रकरणात गंभीर आरोप केले जात असल्यामुळे राज्याचे अन्नपुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप केले जात आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोरही दिवसागणिक वाढला आहे. याचवेळी धनंजय मुंडे आणि धस यांच्यामध्ये बैठक झाल्यानं पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघणार आहेत.मुमडे

भाजप आमदार सुरेेश धस यांनी यावेळी धनंजय मुंडेंची भेट झाल्याचं मान्य केला आहे. त्यावेळी धस म्हणाले, धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यादिवशी रात्री त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी झाकून-लपून नाही. तर त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो, असंही धस यांनी सांगितले.

धस म्हणाले,धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. पर्वा भेटलो ते त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला गेलो होतो. त्यांच्याविरोधातील लढा आणि भेट या वेगळ्या गोष्टी आहेत. जोपर्यंत हत्येतील आरोपी फासावर लटकवलं जात नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. बावनकुळेसाहेब आणि माझी आता भेट होईल, त्यांच्याशी मी बोलेन असंही धस यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT