Suresh Dhas News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणारे सुरेश धस यांनी मुंडेंची भेट घेतल्याचे समोर येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या समोरच धनंजय मुंडे सुरेश धस भेटल्याचे म्हटले तसेच हे दोघे तब्बल साडेचार तास एकत्र असल्याचे सांगितले. धनंजय मुंडेंच्या भेटीवर सुरेश धस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सुरेश धस म्हणाले, 'धनंजय मुंडे यांचे ऑपरेशन झाले होते. त्यांच्या निवासस्थानी मी गेलो होतो. झाकून लपून नाही तर दिवसाढवळ्या मी त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो.त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली होती.'
तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगळे प्रकार आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. या लढ्यात काहीच फरक पडणार नाही. भेट घेतली यामध्ये गहजब करण्यासारखे काय आहे?, असे देखील सुरेश धस म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या समोर धनंजय मुंडे आणि सुरेश धस भेटले. मी तेथे होतो. आमच्या तिघांची ही कौटुंबीक भेट होती. साडेचार तास आम्ही सोबत होतो, असे म्हटले. बावनकुळेंन दिलेल्या या माहिती विषयी पत्रकारांनी सुरेश धस यांना विचारले असता ते म्हणाले, बावनकुळे यांच्यासोबत अशी भेटच झाली नसल्याचे सांगितले. तसेच बावनकुळे यांनी काय सांगितले हे मला माहिती नाही ते तुम्ही त्यांनाच विचारा, असे देखील म्हटले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, सुरेश धस धनंजय मुंडे यांच्यात मतभेद आहेत. मात्र, मनभेद नाहीत. आम्ही तब्बल साडेचार तास एकत्र होतो ही कौटुंबीक भेट होती. या भेटीमध्ये देखील हेच दिसून आले की दोघांमध्ये मनभेद नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.