BJP MLA Prasad Lad Sarkarnama
मुंबई

BJP MLA Prasad Lad: आमदार प्रसाद लाड यांच्यावर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'एक्स'वरून यासंदर्भातील माहिती दिली.

Ganesh Thombare

Mumbai News: भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. आता प्रसाद लाड हे भारतीय जनता पक्ष आणि सरकारमधील समन्वयाची जबाबदारी पार पाडणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'एक्स'वरून (ट्विटर) यासंदर्भातील माहिती दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षात समन्वय साधण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या समन्वयकपदी प्रसाद लाड यांची नेमणूक करण्यात आली होती. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात समन्वय साधण्यासाठी प्रसाद लाड यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर आता भाजपने पुन्हा एकदा प्रसाद लाड यांच्यावर मोठी जबाबदारी देत भाजप आणि सरकारमधील समन्वय साधण्याची भूमिका त्यांना पार पाडावी लागणार आहे. प्रसाद लाड हे दर मंगळवारी आणि बुधवारी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

महायुती सरकारमध्ये वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष एकत्र असल्यामुळे समन्वय राहण्यासाठी आमदार लाड प्रयत्न करणार आहेत. दरम्यान, सध्या भाजप आगामी निवडणुका पाहता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. याच अनुषंगाने आता प्रसाद लाड यांच्यावर दिलेली जाबाबदारीही महत्त्वाची ठरणार आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT