Gunaratna Sadavarte : मेहुण्याचा लाड सदावर्तेंना भोवणार? एसटी बँकेतील सत्ता जाणार...

ST BANK News : 19 पैकी 14 संचालक सदावर्तेंच्या विरोधात गेले असून, कालपासून (गुरुवार) ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.
Gunaratna Sadavarte
Gunaratna SadavarteSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : एसटी बँकेच्या निवडणुकीत ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी डावलून मर्जितील कार्यकर्त्यांना संधी देऊन निवडून आणले. आता त्याच संचालकांनी सदावर्ते यांना धक्का दिला आहे.

19 पैकी 14 संचालक सदावर्तेंच्या विरोधात गेले असून, कालपासून (गुरुवार) ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. समाजात तेढ निर्माण करणे, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न करणे, त्यांच्या विरोधी भूमिका घेणे या कारणामुळे एसटीचे बँकेचे 14 संचालक सदावर्ते यांच्या विरोधात गेल्याची माहिती आहे.

मेहुण्याचे लाड करण्याचा डाव अंगलट

एसटी बँकेत सत्ता मिळवल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी आपले मेहुणे यांना व्यवस्थापकीय संचालकपदावर बसवले. बँकिंग क्षेत्रातील कसलाही अनुभव नसताना इतक्या मोठ्या पदावर बसवल्यानंतर बँकेचे संचालक आणि सभासदांमध्ये सदावर्ते यांच्याबद्दल आहे. मेहुण्याचे लाड करण्याचा डाव त्यांच्याच अंगलट आल्याचे बोलले जात आहे.

सहा महिन्यांपूर्वी एसटी बँकेची निवडणूक झाली. याची चर्चा राज्यभरात झाली होती. एसटी बँकेत एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिकृत संघटनेला मात देऊन सदावर्ते यांनी आपले एकतर्फी पॅनेल विजय केले होते. 19 पैकी 14 संचालक सदावर्ते यांच्या विरोधात गेले असल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gunaratna Sadavarte
Raju Shetti News : लढ्याला यश, पण आता पोलिसांचा ससेमिरा; राजू शेट्टींसह 2500 जणांवर गुन्हा...

सदावर्ते हे समाजात वितुष्ट आणि द्वेष पसरवत आहेत. सामान्य गरीब एसटी कर्मचाऱ्यांचा केवळ राजकारणासाठी उपयोग करत असल्याचा आरोप या चौदा संचालकांनी करत त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

काल होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीला या चौदा संचालकांनी अनुपस्थिती दाखवून हे सर्वजण संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आहेत. केवळ पाच संचालक बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे. उर्वरित 14 संचालक हे कोल्हापूरच्या आजूबाजूच्या परिसरात असल्याची माहिती आहे.

एसटी कर्मचारी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का मानला जात आहे. नॉट रिचेबल असलेले 14 संचालक सदावर्ते यांच्या विरोधात गेले असून, दोन दिवसांत कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत 14 संचालक भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

14 संचालकांच्या मागे कोल्हापूरचा सूत्रधार?

एसटी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीवरून कोल्हापूर विभागात संघर्ष निर्माण झाला होता. सदावर्ते यांचा कार्यकर्ता असणारा एका कर्मचाऱ्याला डावलून ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली होती. त्याचा राग मनात धरून संबंधिताने या चौदा संचालकांच्या मागे ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. या संचालकांच्या मागे कोल्हापूरचा सूत्रधार असल्याची चर्चा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

(Edited By: Mangesh Mahale)

Gunaratna Sadavarte
Nagar News : लाचखोर महिला सरपंच पतीसह अटकेत; दहा टक्के कमिशन घेताना ACB ने पकडलं!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com