Chandrashekhar Bawankule Sarkarnama
मुंबई

Chandrashekhar Bawankule : 'एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली...'; निकालापूर्वीच बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना भावनिक मेसेज

Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरूवात झाली आहे. राज्यात कोणाचं सरकार येणार याची उत्सुकता लागली आहे. मात्र निकालाआधीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे.

Jagdish Patil

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरूवात झाली आहे. राज्यात कोणाचं सरकार येणार याची उत्सुकता लागली आहे. मात्र निकालाआधीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे.

कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ मिळेल आणि भाजप-महायुतीला चांगलं यश मिळेलं असा विश्वासही त्यांनी या पत्रात व्यक्त केला आहे. बावनकुळे यांनी आपल्या पत्रात लिहिलं, 'प्रिय कार्यकर्ते बंधू-भगिनींनो महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 15 ऑक्टोबर रोजी घोषित झाली. आता मतदान पार पडले आहे. शनिवारी मतमोजणी होईल.

(Vidhan Sabha Election 2024 Result live)

निवडणुकीच्या आधीपासून आपण साऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे मतदानाचा टक्का उंचावला आहे. लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात आपण प्रत्येकाने आपापल्या क्षमतांची परिसीमा गाठून योगदान दिल्याची मला विनम्र जाणीव आहे, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेतली. विश्वगौरव, युगपुरुष, आपले कुटुंबप्रमुख, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 2014 ते 2024 या काळात महाराष्ट्र राज्याला भरभरून मदत केली.

त्यामुळे महाराष्ट्र देशातील क्रमांक 1 चे राज्य होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आदरणीय मोदी यांचे योगदान महाराष्ट्रात भाजपा-महायुतीला पुन्हा विजयी करण्यात मोलाचे ठरणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक कुटुंब म्हणून आपण सर्वांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांचे आशीर्वाद आपल्याला नेहमी नवी ऊर्जा देत असतात.

आपले मार्गदर्शक, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी या निवडणुकीत स्वतःला झोकून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला नवी चेतना मिळाली. राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे संघटनात्मक मार्गदर्शन आम्हाला नवी दिशा देणारे होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचाराचा झंझावात सर्व कार्यकर्त्यांना नवा उत्साह देणारा ठरला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, शिवराज सिंह चौहान, पियूष गोयल यांचे मार्गदर्शन, विधानसभा निवडणूक महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांनीयांनी नियोजनबद्ध पद्धतीने केलेले कार्य आणि त्यांची मिळालेली साथ आम्हा सर्वांना रोज नवी ऊर्जा देणारी ठरली, अशा शब्दात त्यांनी सर्व नेत्यांचे आभार मानले.

तसंच यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वातील सरकारमध्ये फडणवीसांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख देखील केली आहे. त्यांनी लिहिलं, 'लाडक्या बहिणींचे देवा भाऊ आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केले. (Maharashtra Election Assembly 2024 news)

शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारमधील फडणवीसांची कामगिरी

तसंच यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारमध्ये फडणवीसांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख देखील केली आहे. त्यांनी लिहिलं, 'लाडक्या बहिणींचे देवा भाऊ आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केले.

त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळाले. मुख्यमंत्री असताना आदरणीय देवेंद्र यांनी 2014 ते 2019 या काळात केलेले कार्य आणि आताच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये देवेंद्र यांनी बजावलेली कामगिरी व सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेले निर्णय ऐतिहासिक स्वरूपाचे आहेत. यामुळे भाजप-महायुतीला या निवडणुकीत बहुमत मिळेल असा मला विश्वास आहे.'

आपल्या कार्यकर्त्यांची जिद्द, इच्छाशक्ती, जनसेवेची आस यामुळेच भाजप देशात तिसऱ्यांदा सत्तेवर आहे आणि महाराष्ट्रातही भाजप-महायुतीला पुन्हा यश मिळेल, याची मला खात्री आहे. मागील दोन वर्षात आपण सर्वांनी सोबत मिळून केलेले संघटनात्मक कार्य या निवडणुकीत आपल्याला यश नक्की मिळवून देणार आहे.

देशाच्या, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपण-आपल्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि भाजप-महायुतीच्या यशासाठी सुयश चिंतितो.' असं शब्दात त्यांनी या निवडणुकीत जोमाने काम करणाऱ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT