Chhagan Bhujbal | Manoj Jarange  Sarkarnama
मुंबई

Video Chhagan Bhujbal : भुजबळांनी जरांगे-पाटलांना घेतलं शिंगावर; म्हणाले, मला घरी बसवलं, तरी...

Chhagan Bhujbal On Maratha Reservation : "सारथीच्या माध्यमातून मराठा मुला-मुलींना अधिक सवलती मिळत आहेत. आणखी तुम्हाला काय पाहिजे?" असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला आहे.

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीत महायुतीला ( Mahayuti ) जरांगे 'फॅक्टर'चा फटका बसला. त्यामुळे सरकार मराठा आरक्षणाबाबत ( Maratha Reservation ) ताकही फुंकून पित आहे. सरकारनं 13 जुलैपर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

पण, विधानसभा निवडणुकीत 9 मंत्र्यांना पाडणार, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला आहे. याला मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तिथे आमदारकीचं काय घेऊन बसलात. मला घरी बसवलं, तरी ओबीसी आरक्षणाचा मुद्द्या रस्त्यावर का होईना, लढत राहणार," असं म्हणत भुजबळांनी ( Chhagan Bhujbal ) जरांगे-पाटलांविरोधात दंड थोपटले आहेत.

छगन भुजबळ म्हणाले, "मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तिथे आमदारकीचे काय घेऊन बसलात. माझे राजकीय करियर चालवणं, पुढे नेणं किंवा संपवणं हे पक्षाच्या हातात आहे. तसेच, जनतेच्या हातात आहे. जनता सर्वश्रेष्ठ आहे. जरांगेंनी 9 मंत्र्यांना घरी बसवावं. मला घरी बसवलं तरी, ओबीसींचा मुद्दा रस्त्यावर का होईना लढत राहणार आहे."

"मराठ्यांवर अन्याय करा, असं आम्ही कुठे म्हणतोय. त्यांना वेगळं आरक्षण द्या, असं सांगत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सवलतींपेक्षा सारथीच्या माध्यमातून मराठा मुला-मुलींना अधिक सवलती मिळत आहेत. आमचा त्यास विरोधही नाही. आणखी तुम्हाला काय पाहिजे?" असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT