Sanjay Raut, Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : राऊतांनी राजकारणात आणला ट्विस्ट; म्हणाले, ...तर भुजबळ 'मुख्यमंत्री'पदाचा टिळा लावूनच बाहेर पडले असते!

Sanjay Raut On Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, भाजपने सपाटून मार खाल्यानंतर आणि शिंदे शिवसेनेला क्रॉस करुन खासदारांच्या संख्येत पुढे गेलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांच्या बोलण्याचा स्पीड शंभर पटीने वाढला आहे.

Jagdish Patil

Sanjay Raut On Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, भाजपने सपाटून मार खाल्यानंतर आणि शिंदे शिवसेनेला क्रॉस करुन खासदारांच्या संख्येत पुढे गेलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांच्या (Sanjay Raut) बोलण्याचा स्पीड शंभर पटीने वाढला आहे.

निकाल लागल्यापासून रोज नवनवे दावे, जिव्हारी लागणारे आरोप, जहरी शब्दांचा वापर करणारे राऊत सत्ताधाऱ्यांना शब्दांनी 'ठोकून' काढत आहेत. त्यामुळे संजय राऊत मीडियाच्या पुढे आले की ते आता काय बोलतील आणि कुठच्या चर्चेला तोंड फोडतील याकडे साऱ्याच्या नजरा लागलेल्या असतात.

अशातच लोकसभा निकालापासून मराठा-ओबीसी आरक्षणामुळे चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे शिवसेनेत असते तर एव्हाना मुख्यमंत्री झाले असते असे सांगून राऊतांना राजकीय वर्तुळात नवा मुद्दा चर्चेत आणला आहे.

त्यामुळे आता साहजिकच शिवसेनेला (Shivsena) सोडचिठ्ठी देण्यापासून आजवरच्या भुजबळांच्या राजकारणाबाबत चर्चा झडत राहिल हे नक्की. दुसरीकडे राऊतांच्या या विधानामुळे भुजबळ काय उत्तर देतील यासाठी मीडियाचे कॅमेरे भुजबळांकडे लागून राहिले आहेत.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणात आणि त्यांच्या आयुष्यात कधीही स्वस्थ झालेले नाहीत. आता छगन भुजबळ शिवसेनेत असते तर आतापर्यंत ते मुख्यमंत्रीपदाचा टीळा लावून बाहेर पडले असते. नारायण राणे, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सर्व अस्वस्थ आत्मे आहेत. हे अस्वस्थ आणि भटकते आत्मे म्हणून फिरत आहेत, अशा शब्दात राऊत यांनी शिवसेनेपासून दूर गेलेल्या नेत्यांवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना राऊत यांनी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मुळात पक्षच नसल्याचं म्हटलं. शिवाय शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली जो पक्ष आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी असल्याचं लोकांनी सिद्ध केलं आहे. दोन चार जागा जिंकल्या पैसे आहेत, यंत्रणा आहे, मग अस्वस्थता कशासाठी आहे? हे फक्त बुडबुडे आहेत. पावसाळ्यात बेडूक येतो आणि नंतर निघून जातो. तसं त्यांचं झालं असल्याची बोचरी टीका राऊत यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटावर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT