Mumbai News : लंडनमधील संग्रहालयातील वाघनखं भारतामध्ये आणण्याचा करार आज पार पडणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास होणाऱ्या या करारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिडिओ कॉन्फरन्समधून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी ही वाघनखं भारतात येणार आहे. सुरुवातीला साताऱ्यातील वस्तुसंग्रहालयात ही वाघनखं ठेवण्यात येतील. त्यानंतर नागपूर, कोल्हापूर आणि मुंबईमध्ये लोकांना वाघनखं पाहता येणार आहेत. (Latest Marathi News)
*वाघनखं सुरुवातीला साताऱ्यातील संग्रहालयात ठेवली जातील.
*१५ ऑगस्ट २०२४ रोजी ही वाघनखं नागपूरच्या वस्तुसंग्रहालयात ठेवली जातील.
*१५ एप्रिल २०२५ रोजी ही वाघनखं कोल्हापूरच्या संग्रहालयात आणली जाणार आहेत.
*१५ नोव्हेंबर २०२५ रोजी ही वाघनखं मुंबईच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.
*१६ ऑक्टोबरला ही वाघनखं पुन्हा लंडनला रवाना करण्यात येणार आहे.
मुंबईकरांना शिवाजी महाराजांची ही वाघनखं २०२५ या वर्षाच्या अखेरीस पाहायला मिळणार आहे., यानंतर करारानुसार ही वाघनंखं पुन्हा लंडनला पाठवण्यात येणार आहेत. यामुळे वाघनखं आता कायमस्वरूपी भारतात येणार नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.