Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh  Sarkarnama
मुंबई

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : महाराजांची वाघनखं फक्त तीन वर्षांसाठीच महाराष्ट्रात ? मुनगंटीवार म्हणाले...

Sudhir Mungantiwar On Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : "वाघनखं परत देण्याच्या संदर्भाने त्यांनी सूतोवाच केले आहे. "

Chetan Zadpe

Mumbai News : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक मोहिमांमध्ये वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली होती. त्यामुळे आता भवानी तलवारीपाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं राज्यात येणार आहेत. पण ही वाघनखं फक्त तीन वर्षांसाठीच महाराष्ट्रात येतील, त्यानंतर ती पुन्हा लंडनला पाठवण्यात येणार आहेत, अशी चर्चा होती. यावर आता मुनगंटीवार यांनीच खुलासा केला आहे. (Latest Marathi News)

लंडनच्या वस्तू संग्रहातील छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत, पण ही वाघनखं केवळ तीन वर्षांसाठीच महाराष्ट्रात असणार आहेत. मात्र, ही वाघनखं कायमस्वरूपी महाराष्ट्रात राहण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येते आहे. ही वाघनखं कायमस्वरूपी राज्यात कशी आणता येतील, यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव ब्रिटनला पाठवलेला आहे.

यासंदर्भात राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील सर्व वस्तू भारतात-महाराष्ट्राच याव्यात, अशी आमची इच्छा आहे. आता वाघनखं परत देण्याच्या संदर्भाने त्यांनी सूतोवाच केले आहे. पहिल्यांदा ते एका वर्षासाठी देतो म्हणाले, पण आता तीन वर्षांसाठी देतो म्हणाले. ते स्थायी स्वरूपात आपल्याकडे यावेत, असा प्रयत्न आपला असणार आहे. "

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT