Mumbai News, 07 Feb : छावा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. याच चित्रपटाची चर्चा राज्याच्या विधानपरिषदेत देखील सुरू आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होत असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी छावा चित्रपटाचा उल्लेख करत केलेल्या एका वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
"छत्रपती संभाजी महाराजांवर कसे अत्याचार झाले, तरी त्यांनी धर्म बदलला नाही. तसेच माझ्यावरही तुरुंगात अत्याचार झाले, पण मी पक्ष बदलला नाही", असं वक्तव्य परब यांनी केल्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
परबांनी स्वत:ची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केल्याचा आरोप भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे. तर याच मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
पायऱ्यांवर उभं राहून बघायचा चॅनेलचा बूम आणि ठोकायची धूम, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं आहे. विधानपरिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव घेता शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "सत्तेच्या खुर्चीसाठी कोणी काय काय सोडलं 2019 मध्ये.
हिंदुत्व सोडलं, वडिलांचे विचार सोडून शत्रूच्या छावणीमध्ये जाणाऱ्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान किंवा बरोबरी करणं हे योग्य होणार नाही. त्यांना तो नैतिक अधिकार देखील नाही, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा समाचार घेतला.
तर काहीजण टुरिस्ट म्हणून येतात आणि टुरिस्ट म्हणून जातात. सभागृहाबाहेर बाहेर पायऱ्यांवर उभं राहून बघायचा चॅनेलचा बूम बघतात आणि बोलून झालं की धूम ठोकतात. कशाला पाहिजे हे सगळं? या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांची वळवळ सुरू आहे. म्हणून ही वळवळ बंद केली पाहीजे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.